Home अहमदनगर अहमदनगर: तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ

अहमदनगर: तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ

Ahmednagar Suicide News: या तरुणाने वैफल्यग्रस्त होऊन आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली, आत्महत्येमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

young man committed suicide by hanging himself

कोपरगाव: कोपरगाव तालुक्यातील शिरसगाव शिवारात आज सकाळी ०९ वाजेपूर्वी शेती व दुग्ध व्यवसाय करत असलेल्या योगेश कैलास जाधव (वय-२९) या तरुणाने वैफल्यग्रस्त होऊन आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली (Suicide) असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे शिरसगाव सह तालुक्यात खळबळ उडाली आहे.

दरम्यान मिळालेल्या माहिती नुसार सदर मयत तरुण योगेश जाधव हा आपला पारंपरिक शेती आणि दुग्ध व्यवसाय करत होता.त्याचे काही वर्षांपूर्वी लग्नही झालेले होते. मात्र काही कारणाने त्याची पत्नी त्यास सोडून माहेरी गेलेली होती. त्यातून तो मानसिक तणावात असल्याची माहिती आहे. त्याच्या आत्महत्येमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी खबर देणारे इसम विलास सुखदेव जाधव (वय ५३) रा. शिरसगाव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, “मयत योगेश जाधव हा आपल्या राहत्या घरी दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

दरम्यान मिळालेल्या माहिती नुसार सदर मयत तरुण योगेश जाधव हा आपला पारंपरिक शेती आणि दुग्ध व्यवसाय करत होता. त्याचे काही वर्षांपूर्वी लग्नही झालेले होते. मात्र काही कारणाने त्याची पत्नी त्यास सोडून माहेरी गेलेली होती. त्यातून तो मानसिक तणावात होता. घरी आई, वडील आणि लहान भाऊ असे अन्य सदस्य होते. दि. १८ जानेवारी रात्री ते दि. १९ जानेवारी रोजी सकाळी ०९ वाजे पूर्वी कधीतरी त्याने आपल्या घरी छताला गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवला असल्याचे सकाळी त्यांच्या घरच्या अन्य व्यक्तींच्या लक्षात आले आहे. त्यामुळे त्यांच्यात खळबळ उडाली आहे.

दरम्यान या प्रकरणी खबर देणार विलास जाधव यांनी या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. घटनास्थळी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक चंद्रकांत काळे यांनी भेट दिली आहे.

या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात धाव घेऊन अकस्मात मृत्यू नोंद क्रं.०४/२०२३ सी.आर.पी.सी. १७४ प्रमाणे दप्तरी नोंद दाखल केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक काळे हे करत आहेत.

Web Title: young man committed suicide by hanging himself

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here