Home Accident News अहमदनगर: मोटारसायकल मालवाहू ट्रेलरचा अपघात; 14 महिन्याचा बालक ठार

अहमदनगर: मोटारसायकल मालवाहू ट्रेलरचा अपघात; 14 महिन्याचा बालक ठार

Ahmednagar Accident: ट्रेलरने मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील महिला जखमी झाली तर तिचा 14 महिने वयाचा मुलगा ठार (Death).

Motorcycle cargo trailer accident A 14-month-old child was killed

सोनई: घोडेगाव येथील नगर-औरंगाबाद महामार्गावरील शनी चौकात गुरुवारी दुपारी सव्वातीन वाजता औरंगाबादहून नगरकडे जाणार्‍या ट्रेलरने मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात (Accident) मोटारसायकलवरील महिला जखमी झाली तर तिचा 14 महिने वयाचा मुलगा ठार झाल्याची घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, औरंगाबादहून नगरकडे पत्र्याचे रोल घेऊन जाणारा मालवाहू ट्रेलर (एमएच 40 सीडी 4285) व सोनई कडून कुकाण्याकडे जाणारी प्लॅटीना मोटरासायकल (एमएच 17 सीएस 4734) यांच्यात अपघात झाला. त्यात रिहान सद्दाम शेख (वय 14 महिने) हा बालक ठार झाला तर त्याची आई नजमा सद्दाम शेख (वय 25) ही गंभीर जखमी झाली.

जखमी महिला व मृत बालक यांना जवळच असलेल्या ग्रामीण रुग्णालय येथे नेले. येथे वैद्यकिय अधिकारी नसल्याने महिलेला तातडीने उपचार मिळाले नाही. त्या महिलेस नगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले.

रस्त्यावर बालकाच्या मेंदुचे अवशेष व रक्त सांडलेले पाहून बघणारे हळहळत होते.नजमाचे वडिल मदतीची याचना करत होते. ताबडतोब 108 रुग्णवाहिकेस फोन करुन सोनई पोलीस ठाण्याला कळवण्यात आले.

नजमा सद्दाम शेख ही महिला तिच्या बालकासह (रिहान) लग्नासाठी परगावी आली होती.लग्न समारंभ आटोपल्याने ती वडीलांना घेऊन सासरी (उमापूर ता. गेवराई जि. बीड) येथे चालली होती. नजमाचे वडिल (नाव समजले नाही) यांना किरकोळ दुखापत झाली.

महिला बालकाला घेऊन मोटरसायकलवर मागे बसली होती. तर तिचे वडील मोटारसायकल चालत होते. ट्रेलरचा धक्का लागल्याने महिला व बालक खाली पडले. या गडबडीत ट्रेलर चालक पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना बालक ट्रेलरच्या चाकाखाली गेले. महिलाही गंभीर जखमी झाली. नागरिकांनी ट्रेलर पाचशे मिटर अंतरावर पकडला. चालक फरार झाला. सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Web Title: Motorcycle cargo trailer accident A 14-month-old child was killed

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here