मोबाइलचा वापर कमी करण्यास सांगितल्यामुळे तरुणाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
Ahmednagar: मोबाइलचा वापर कमी करण्यास सांगितल्यामुळे स्वतःच्या विहिरीत तरुणाची आत्महत्या (Suicide).
राहता: राहाता तालुक्यातील पिंपळवाडी येथील गजानन सोपान सालपुरे (वय २१) या तरुणाने शिंगवे शिवारात आपल्या स्वतःच्या विहिरीत आत्महत्या केली.
बुधवार, दि. २६ रोजी ‘मी शेतात चाललो’, असे सांगून गजानन घराबाहेर पडला. परंतु, मुलगा घरी न आल्यामुळे संतोष जालिंदर सालपुरे यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मोबाइलचा वापर कमी करण्यास सांगितल्यामुळे मुलगा निघून गेला, असा उल्लेख तक्रारीत करण्यात आल्याची माहिती राहाता पोलिसांनी दिली. गेल्या गुरुवारी विहिरीशेजारी मुलाच्या चप्पल व मोटारसायकल आढळल्याने विहिरीत उडी मारली, असा कुटुंबीयांना संशय आला. विहिरीत कॅमेरा लावून पाहणी केली असता मुलगा विहिरीत आढळला नाही. परंतु, त्याच विहिरीतून शनिवारी साडेआठ वाजता मृतदेह फुगून पाण्यावर तरंगला.
Web Title: young man committed suicide by jumping into a well
See Latest Marathi News, Ahmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App