Home संगमनेर संगमनेर तालुक्यात दहा एकर ऊस जळून खाक, २० लाखांचे नुकसान

संगमनेर तालुक्यात दहा एकर ऊस जळून खाक, २० लाखांचे नुकसान

भीषण आगीत (Fire) येथील पाच शेतकऱ्यांचा तब्बल १० एकर ऊस जळून (Burnt) खाक झाला.

acres of sugarcane burnt, loss of 20 lakhs

आश्वी: संगमनेर तालुक्यातील ओझर खुर्द येथे शनिवारी दुपारी वीज वाहक तारांच्या घर्षणामुळे लागलेल्या भीषण आगीत येथील पाच शेतकऱ्यांचा तब्बल १० एकर ऊस जळून खाक झाला. या शेतकऱ्यांचे अंदाजे २० लाखांचे नुकसान झाल्याची माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी दिली आहे.

ओझर खुर्द शिवारातील नेमबाई माळ पायथ्यालगत सावित्रीबाई दत्तू साबळे यांची गट नंबर २११/३, विठाबाई लक्ष्मण साबळे यांची गट नंबर २११ / ४, उज्ज्वला शिवराम साबळे यांची गट नंबर २११ / ४, बनाजी बाळाजी साबळे यांची गट नंबर २१४ / ३ व मधुकर सखाराम ठोसर यांची गट नंबर १८८ मध्ये ऊसाची शेती आहे. शनिवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास वीज वाहक तारांच्या घर्षणामुळे ठिणग्या खाली पडल्यामुळे ऊसातील पाचटाने पेट घेतला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

अग्नीसह धुराचे मोठे लोळ आकाशाकडे जात असल्याचे लक्षात आल्यामुळे स्थानिक नागरिकांसह शेतकऱ्यांनी अग्नीने उग्र रूप धारण केलेल्या ऊसाच्या शेताकडे धाव यश आले आहे.

यावेळी सरपंच पुंजाहरी शिंदे, दरम्यान, ग्रामपंचायत सदस्य बकचंद साबळे, लक्ष्मण साबळे, विठ्ठल साळुंखे, कैलास गोराणे, जयराम कांदळकर, कचर शिंदे, भिका कांदळकर, दौलत बनवाले, साहेबराव उंबरकर, झुंगा साबळे, जगन शिंदे, शिवराम साबळे, मधुकर ठोसर, बनाजी साबळे, जिजाभाऊ शिंदे, विनायक कांदळकर, कारभारी साबळे, धोंडीबा बनवाले, दत्तु शिंदे यानी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केल्यामुळे शेजारी असलेला शेकडो एकर ऊस वाचविण्यात त्यांना यश आले.

यावेळी संगमनेर कारखान्याचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला असला तरी, तोपर्यंत तब्बल १० एकर ऊस जाळून खाक झाला होता. त्यामुळे सावित्रीबाई दत्तू साबळे, विठाबाई लक्ष्मण साबळे, उज्ज्वला शिवराम साबळे, बनाजी बाळाजी साबळे, मधुकर सखाराम ठोसर या पाच शेतकऱ्यांचे अंदाजे २० लाखांचे नुकसान झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली असून या शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी केली आहे. 

Web Title: acres of sugarcane burnt, loss of 20 lakhs

See Latest Marathi NewsAhmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here