Home अहमदनगर Onion Rate: आवक घटल्याने कांद्याला आला भाव

Onion Rate: आवक घटल्याने कांद्याला आला भाव

Onion Rate: नगरमध्ये कांदा ३८०० रुपये: पावसाने नुकसान झाल्याचा परिणाम, आवक घटल्याने कांद्याला समाधानकारक भाव.

price of onion rate has increased due to decrease in incomeअहमदनगर : गेल्या महिनाभरापासून सतत सुरू असलेल्या पावसाने नवीन कांदा रोपांचे झालेले नुकसान, तसेच चाळीतील कांदाही खराब झाल्याने दिवाळीनंतर कांद्याची आवक घटली असून कांद्याचे भाव साडेतीन हजारांच्या पुढे गेले आहेत. नगर बाजार समितीत शनिवारी झालेल्या लिलावात प्रथम प्रतवारीच्या कांद्याला ३८०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. या वर्षीचा हा उच्चांकी भाव आहे. मागील वर्षीही दिवाळीत पावसामुळे कांद्याचे नुकसान झाले होते. त्यामुळे कांद्याला पुढे भाव येईल या आशेवर उन्हाळी कांद्याची विक्रमी लागवड झाली. परंतु समाधानकारक भाव मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी उन्हाळी कांदा मे जूनमध्येच चाळीत भरून ठेवला. मात्र, दिवाळीपर्यंतही कांदा दोन-अडीच हजारांच्या पुढे सरकला नाही.

दरम्यान, यंदा खरिपात लागवड झालेल्या कांद्याचे सततच्या पावसाने नुकसान झाले. अनेक ठिकाणी रोपांचेही नुकसान झाल्याने कांदा लागवडी ठप्प झाल्या. दुसरीकडे चाळीत ठेवलेला कांदाही पावसामुळे खराब होऊ लागला. ऑक्टोबरच्या सुरुवातीपर्यंत कांद्याला दीड ते दोन हजार रुपयांपर्यंतच भाव होता. कांदा खराब होण्यापेक्षा आहे त्या भावात विकण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी चाळीतील कांदा बाहेर काढला. परिणामी १० ऑक्टोबरपासून नगर बाजार समितीत सव्वा लाख गोण्यांच्या आसपास आवक होऊ लागली. पुढील दहा दिवस ही आवक अशीच लाखाच्या आसपास टिकून होती. परंतु दिवाळीनंतर ही आवक थेट निम्म्याने कमी झाली. शनिवारी (दि. २९) नेप्ती कांद्याची मागणी लक्षात घेता कांद्याचे बाजार समितीत ५६ हजार कांदा भाव वाढले. शनिवारी नगरमध्ये प्रथम गोण्यांची आवक झाली. दरम्यान, प्रतवारीच्या कांद्याला ३१०० ते ३८०० राज्यात झालेल्या पावसाने सर्वत्रच रुपयांचा भाव मिळाला. आवक कमी कांद्याचे नुकसान झाल्याने, तसेच होत असल्याने आणखी भाव सणासुदीच्या दिवसांत वाढलेली वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गेले वर्षभर कांदा सरासरी दीड ते दोन हजारांच्या घरातच राहिला. त्यामुळे साठवणूक केलेल्या कांदा शेतकऱ्यांचा हिरमोड झाला. आता जेव्हा चाळीतील कांदा संपण्याच्या स्थितीत आहे, तेव्हा भाव वाढले आहेत. त्यामुळे हे वाढलेले दर किती शेतकऱ्यांच्या पदरात पडतात, हाही प्रश्नच आहे. दरम्यान, ३८०० रुपये हा दर यावर्षीचा आतापर्यंतचा उच्चांकी आहे.

नवीन कांदा लागवड सुरु

दिवाळीला पावसाने उघडीप दिल्यानंतर आता नवीन कांद्याची लागवड शेतकयांनी सुरु केली आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे कांद्याची रोपे खराब झाली. आता नवीन रोप लागवड करण्यासह कांद्याची पेरणी करण्याकडेही कल आहे. अनेक शेतकरी वाफसा होण्याची वाट वाहत आहेत.

Web Title: price of onion rate has increased due to decrease in income

See Latest Marathi NewsAhmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here