Home अहमदनगर जिल्ह्यातील या गावात तरुणाचा म्युकरमायकोसिसने मृत्यू  

जिल्ह्यातील या गावात तरुणाचा म्युकरमायकोसिसने मृत्यू  

Young man dies of mucormycosis

साकुरी | Mucormycosis: शिर्डी शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बऱ्यापैकी आटोक्यात आला असताना अचानक मनाला चटका लावून जाणारी बातमी शिर्डीकरांच्या मनाला चटका लावून गेली आहे.

शिर्डी येथील एका तरुणाचा म्युकरमायकोसिसने दुर्दैवी मृत्यू झाल्याने शिर्डीत म्युकरमायकोसिसने पहिला बळी घेतल्याने शिर्डी परिसरात खळबळ उडाली आहे.

येथे पहा: हार्दिक पांड्याची बॅटिंग १ ओव्हर ६ ६ ६ ६ ४ १, हेलिकॉप्टर शॉट

शिर्डी येथील पिंपळवाडी रोडवरील आसने वस्ती येथील एका तरुणाला म्युकरमायकोसिसने हा जीवघेणा आजार जडला होता. सर्वप्रथम त्यास शिर्डी येथील साईबाबा सुपर स्पेशालिटी होस्पिटल आठ दिवसांपूर्वी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याचवेळी हा आजार झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर त्यास नाशिक येथील शताब्धी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याची डोळे व गालाची शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र त्याचे शनिवारी रात्री निधन झाले. त्याच्या अकाली निधनाने शिर्डी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.  

Web Title: Young man dies of mucormycosis

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here