Home अहमदनगर जेवणाच्या बिलाचे पैसे मागितल्याने हॉटेल मालकाचा खुनाचा प्रयत्न

जेवणाच्या बिलाचे पैसे मागितल्याने हॉटेल मालकाचा खुनाचा प्रयत्न

Jamkhed hotel proprietors trying to murder

जामखेड: जेवणाच्या बिलाचे पैसे मागितल्याच्या करणातून हॉटेल मालकास बेदम मारहाण करत गळा दाबून खून करण्याची घटना जामखेड तालुक्यातील नान्नज गावात एका गावात घडली. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली आहे.

ईस्माईल महेमूद शेख (42, रा. नान्नज) असे खुनाचा प्रयत्न करणार्‍या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी त्यास अटक केली आहे. याप्रकरणी निजाम शेख यांनी तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार निजाम शेख यांचे नान्नज येथे ब्ल्यू डायमंड नावाचे हॉटेल आहे. संशयित ईस्माईल हा दुपारी जेवण करण्यासाठी हॉटेलमध्ये आला होता. जेवण झाल्यानंतर जेवणाचे बील हॉटेल मालक निजाम शेख यांनी मागितल्याचा राग आल्याने ईस्माईल याने पेप्सी, सेवनअप अशा थंड पेयाच्या बाटल्या फेकून मारत एक बाटली अर्धी फोडून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर हॅाटेलमालकास पकडून दोन्ही हाताने गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न ( Trying to Murder) केला.

येथे पहा: हार्दिक पांड्याची बॅटिंग १ ओव्हर ६ ६ ६ ६ ४ १, हेलिकॉप्टर शॉट

अखेर निजाम यांनी कशीबशी आपली सुटका करून घेत पळ काढल्याने ते बचावले. याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात ईस्माईल शेख विरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक पुढील तपास सहायक निरीक्षक जानकर हे करत आहेत.

Web Title: Jamkhed hotel proprietors trying to murder

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here