Home अहमदनगर अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य, विनयभंगाचा गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य, विनयभंगाचा गुन्हा दाखल

Ahmednagar News indecent assault with a minor girl

अहमदनगर | Ahmednagar News: नगर शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात लुडो खेळण्याच्या बहाण्याने ८ वर्षीय अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य करून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नगर शहरातील स्टेशन रोड परिसरातील एका फळ विक्री ज=करणाऱ्या महिलेच्या घरासमोर राहणाऱ्या तरुणाने सदर महिला घरात झोपलेली असताना तिची मुलगी घराबाहेर खेळत होती. त्यावेळी तरुणाने तिला लुडो खेळ खेळण्याच्या बहाण्याने घरात बोलाविले, आणि तिचे कपडे काढून लज्जा उत्पन्न होईल असे अश्लील कृत्य केल्याने ती मुलगी मोठ्याने ओरडली असता तिचा तिचा आवाज ऐकून आई धावली आणि मुलीस तेथून घेऊन आली. मुलीस काय झाले असे विचारले असता तिने सर्व प्रकार कथन करत या अगोदरही असा प्रकार केल्याचे तिने सांगितले.

येथे पहा: हार्दिक पांड्याची बॅटिंग १ ओव्हर ६ ६ ६ ६ ४ १, हेलिकॉप्टर शॉट

याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास कोतवाली पोलीस करीत आहे.

Web Title: Ahmednagar News indecent assault with a minor girl

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here