Home महाराष्ट्र धक्कादायक! पबजी खेळता खेळता तरुण इमारतीवरून खाली कोसळला

धक्कादायक! पबजी खेळता खेळता तरुण इमारतीवरून खाली कोसळला

young man fell down from the building while playing PubG Game

पालघर | Palghar: पबजीच्या (PubG Game) अनेक घटना घडल्या आहेत. नुकतेच पबजी हा खेळ खेळणं पालघर  मधील शिरगाव येथिल एका 16 वर्षीय तरुणाला चांगलच महागात पडलं आहे. हा तरुण आपल्या मित्रांसोबत शिरगाव येथील एका अंडर कन्स्ट्रक्शन इमारतीवर पबजी खेळत होता.

मात्र तो या पबजी खेळात इतका गुंतला की तो दुसऱ्या मजल्यावर आहे याचा त्याला विसर पडला होता.  खेळता खेळता अचानक हा युवक दुसऱ्या माळ्यावरून खाली पडला असून यात त्याला गंभीर दुखापत झाली आहे. जखमी शादान वर सध्या पालघर मधील रिलीफ रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या गेममुळे मुलांमध्ये हिंसा, आक्रमकता, ऑनलाईनचे वेड आणि व्यसनाधीनता वाढलेली आहे. काहींनी तर पब्जी वेडापायी आपला जीव देखील गमावला असल्याची धक्कदायक घटना घडली आहे. तर काहीचं मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे. त्यामुळे याची गंभीर घेत केंद्राने या गेमवर बंदी आणली आहे. मात्र बंदी असूनही लहान मुलं पबजी गेम खेळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Web Title: young man fell down from the building while playing PubG Game

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here