Home अहमदनगर अहमदनगर: घरावर बाभळीचे झाड कोसळल्याने तरुण ठार

अहमदनगर: घरावर बाभळीचे झाड कोसळल्याने तरुण ठार

Ahmednagar News: वादळासह जोरदार पावसाचा तडाखा, घरावर बाभळीचे भलेमोठे झाड कोसळून घरात बसलेल्या तरुणाचा त्याखाली दबून दुर्दैवी मृत्यू (Death) झाल्याची घटना.

young man was Death when an acacia tree fell on the house

कोपरगाव| Kopargaon: जिल्ह्यात वादळासह जोरदार पावसाचा तडाखा सुरूच आहे. घरावर बाभळीचे भलेमोठे झाड कोसळून घरात बसलेल्या तरुणाचा त्याखाली दबून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि. २८) रात्री कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव शिवारात घडली. दत्तात्रय संजय मोरे (वय २९) असे मृत तरुणाचे नाव आहे.

कोपरगाव तालुक्यात शुक्रवारी संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. त्यातून अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली. अशातच ब्राम्हणगाव येथे ही दुर्दैवी घटना घडली. घटना घडल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत तरुणाला बाहेर काढून कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले असता तेथील डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत जाहीर केले.

याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, असून, तो शेतमजुरी आणि मालवाहू रिक्षा चालवण्याचे काम करीत होता.  मयत दत्तात्रय याच्या मागे आई, वडील, पत्नी, लहान मुलगी असा परिवार आहे. दत्तू हा घरात एकुलता एक कमावता मुलगा असल्याने त्याच्या जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गेले दोन दिवसांपासून जिल्ह्यात वादळी वाऱ्याने मोठे नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच कोपरगावचे तहसीलदार विजय बोरुडे, पोलिस अधिकाऱ्यासह कोल्हे कारखान्याची यंत्रणा मदतीस पोहोचली होती.

Web Title: young man was Death when an acacia tree fell on the house

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here