Home अहमदनगर अहमदनगर: सराईत आरोपीच्या डोक्यात दगड घालून खून, दोघांना अटक

अहमदनगर: सराईत आरोपीच्या डोक्यात दगड घालून खून, दोघांना अटक

Ahmednagar News: शहरात घरफोडी, चोरी करणाऱ्या सराईत आरोपीच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून (Murder) केल्याची घटना.

Ahmednagar Murder Accused stoned to death in Sarai, two arrested

अहमदनगर: शहरात घरफोडी, चोरी करणाऱ्या सराईत आरोपीच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्यात आल्याची घटना शनिवारी घडली. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलिसांनी दोन आरोपींना १२ तासांच्या आत अटक केली. पडली.

लखन अनिल घोरपडे (रा. लालटाकी, भारस्कर कॉलनी) असे मयताचे नाव आहे. तर सनी संजय डाके (वय १९), दीपक रावसाहेब चांदणे ( वय २८, दोघेही रा. सिद्धार्थनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. मयताची पत्नी वंदना यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. या फिर्यादीत म्हटले आहे, लखन व वंदना असे दोघे लालटाकी येथील ज्युसच्या गाडीजवळ बसलेले असताना ज्युस गाडीचा मालक मुन्नाभाई याने चेष्टेत लखन याच्या अंगावर पाणी फेकले. त्यावेळी लखन याने खाली पडलेली फरशी मुन्नाभाई याच्याकडे फेकल्याचे नाटक केले. त्यावेळी ही फरशी मागे पडली.

त्याचवेळी सिद्धार्थनगर येथील सनी डाके, दीपक चांदणे, हंट्या शिंदे असे तिघे मोटारसायकलवरून आले व लखन यास आम्हाला फरशी मारतो का, असे म्हणून डोक्यात दगड मारून जिवे ठार मारले, असे फिर्यादीत म्हटले आहे. वंदना घोरपडे यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात तिघा जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. केली.

पोलिस अधीक्षक राकेश ओला साहेब यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना समांतर तपास करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, सनी डाके व दीपक चांदणे हे कोठेतरी पळून जाण्याच्या तयारीत असून, ते माळीवाडा बसस्थानकावर असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने तेथे जाऊन दोघांना ताब्यात घेतले. ही कारवाई आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील सहायक फौजदार राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, पोलिस हेडकॉन्स्टेबल देवेंद्र शेलार, सुरेश माळी, पोलिस नाईक विशाल दळवी, पोलिस कॉन्स्टेबल सागर ससाणे व चालक भरत बुधवंत यांनी

Web Title: Ahmednagar Murder Accused stoned to death in Sarai, two arrested

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here