आश्रम शाळेतील मुलीवर अत्याचार करणाऱ्या तरुणास सक्त मजुरीची शिक्षा
Ahmednagar News: एका आश्रमशाळेत शिक्षण घेत असलेल्या मुलीवर अत्याचार (abused) केल्याप्रकरणी आरोपी, सात वर्षे सक्त मजुरी तसेच २० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली.
अहमदनगर: शेवगाव तालुक्यातील एका आश्रमशाळेत शिक्षण घेत असलेल्या मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी महेश प्रभाकर चाचर (३०, रा. बोधगाव, ता. शेवगाव) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. ए. बरालिया यांनी सात वर्षे सक्त मजुरी तसेच २० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे. सरकारी पक्षाच्या वतीने अॅड. पुष्पा कापसे -गायके यांनी बाजू मांडली.
पीडिता ही तीन वर्षांपासून एका दिली. शाळेत शिक्षण घेत होती. ती तिथेच मुलींच्या वसतिगृहात राहत होती. शाळेतील वार्डनने तिच्यावर अत्याचार केला. ही घटना सन २०१९ मध्ये घडली होती. आरोपी व त्याची पत्नी मुलींच्या वसतिगृहाशेजारीच राहावयास होते. आरोपीने पीडितेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. त्यास पीडितेने प्रतिकार केला. त्यानंतर आरोपीने पीडितेवर अत्याचार करत सदर घटना कुणाला सांगितल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे पीडिता पूर्णपणे घाबरून गेली होती. त्यामुळे तिने नातेवाइकांना माहिती दिली नाही. ही बाब पीडितेच्या मैत्रिणींच्या लक्षात आली. त्यांनी शाळेच्या प्राचार्यांना याबाबत माहिती
त्यानंतर प्राचार्यांनी पीडितेच्या नातेवाइकांना बोलावून घेऊन घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पीडितेच्या चुलतीने बाल लैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यावर न्यायालयात सुनावणी होऊन १४ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवून घेत वरील निकाल देण्यात आला.
Web Title: a young man who abused a girl in an ashram school was sentenced to hard labor
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App