Home महाराष्ट्र लैंगिक अत्याचाराला कंटाळून तरुणीची तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

लैंगिक अत्याचाराला कंटाळून तरुणीची तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

Young woman commits suicide by jumping from the third floor

कल्याण: लैंगिक अत्याचाराला (Sexual abusing) कंटाळून आलेल्या नैराश्येतून तरुणीने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या (suicide) केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी कोलशेवाडी पोलिसांनी ८ जणांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे/. या प्रकरणाची दखल राज्य महिला आयोगाने घेतल्याने हा प्रकार समोर आला आहे.

एका तरूणीला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन  सात तरुण गेल्या दीड वर्षापासून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होते. या प्रकारात एका तरुणीचा सहभाग होता. या त्रासाला कंटाळून नैराश्यातून या तरुणीने राहत्या इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावरून उडी घेत आत्महत्या केली. ही घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली होती.  याप्रकरणी पीडितेच्या मोबाईलमधील सुसाईड नोटचा तपास करत कोळशेवाडी पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तातडीने कारवाई करत पोलिसांनी आठही जणांना बेड्या ठोकल्या. आरोपीमध्ये कल्याण मधील धनदांडग्या बिल्डरची मुलं असल्याने आमच्यावर दबाव टाकला जात असल्याचा आरोप  मयत पीडितेच्या कुटुंबीयांनी केला होता. या प्रकरणी महिला आयोगाने गंभीर दखल घेतली असून ट्विटद्वारे माहिती दिली आहे.

Web Title: Young woman commits suicide by jumping from the third floor

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here