Home क्राईम Rape: दोन लग्न लपवून ठेवत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीवर बलात्कार

Rape: दोन लग्न लपवून ठेवत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीवर बलात्कार

Rape Case:  आरोपीचे आधीच दोन लग्न झालेली होती. हे लपवून त्याने फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवले. आणि फिर्यादी सोबत वारंवार शरीर संबंध.

a young woman who was preparing for a exam was rape

पुणे | Pune : दोन लग्न झाल्याचे लपवून ठेवत लग्नाचे आमिष दाखवून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका 24 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंदन नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमनाथ संभाजी कोदरे (वय 38, मातोश्री बिल्डिंग, केशवनगर, मुंढवा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली. पीडित तरुणीने या प्रकरणी तक्रार दिली आहे.

याप्रकरणी सविस्तर माहिती अशी की, पीडित तरुणी ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करते. पुण्याच्या सदाशिव पेठेत ती राहण्यासाठी आहे. काही दिवसांपूर्वी तिने अपना ऍपच्या माध्यमातून नोकरीसाठी अर्ज केला होता. या माध्यमातून फिर्यादीला हॉटेल रीजन्सी मधून एक फोन आला होता. तेव्हपासून आरोपी आणि फिर्यादी यांची ओळख झाली होती. आरोपीने फिर्यादीला तो हॉटेलचा मालक असल्याचे सांगून मैत्री केली. मैत्रीचें रूपांतर प्रेमात झाले आणि त्यानंतर दोघांमध्ये वारंवार शरीरसंबंध आले.

Business Idea | कार मधून कसे पैसे कमवतात | Car Business Earn Money

दरम्यान, आरोपीचे आधीच दोन लग्न झालेली होती. हे लपवून त्याने फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवले. आणि फिर्यादी सोबत वारंवार शरीर संबंध ठेवले. एके दिवशी आरोपीचे आधीच लग्न झाले असल्याचे फिर्यादीला समजल्यानंतर तिने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. चंदन नगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Web Title: a young woman who was preparing for a exam was rape

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here