Home Accident News दुचाकींच्या अपघातात जवानासह तरुणाचा मृत्यू

दुचाकींच्या अपघातात जवानासह तरुणाचा मृत्यू

Ahmednagar News:  दोघे मावसभाऊ यांचे अपघाती (Accident) निधन, नाशिक जिल्ह्यातील पाथरे शिवारातील घटना.

youth along with a jawan died in a two-wheeler accident

कोपरगाव : शिर्डी-नाशिक महामार्गावर रविवारी (दि. १६) पाथरे शिवारात झालेल्या अपघातात भारतीय सैन्य दलातील जवान धानोरे (ता. निफाड) येथील सचिन राजाराम गुजर (वय २४, रा. धानोरे, ता. निफाड) व अक्षय पाटीलबा जावळे (वय २५, सोनेवाडी, ता. कोपरगाव) यांचा मृत्यू झाला. या अपघातात अक्षय गायकवाड (रा. खेडलेझुंगे) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.

अक्षय जावळे व सचिन गुजर हे दोघे मावसभाऊ होते. त्यांच्या अपघाती निधनाने सोनेवाडी व धानोरे परिसरात मोठी शोककळा पसरली आहे. शवविच्छेदन केल्यानंतर अक्षय जावळे यांचे पार्थिवावर शोकाकुल वातावरणात सोनेवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. तर शिर्डी  येथे उपचारादरम्यान काल सचिन गुजर यांचा मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव शेवविच्छेदन करण्यासाठी नाशिक येथे हळविण्यात आले आहे. त्यांच्यावर उद्या शासकीय इतमामात धानोरे येथे अंत्यसंस्कार होणार आहे.

सिन्नर येथून पल्सर मोटरसायकल (एमएच 15 एचए 9006) जावळे व गुजर सोनेवाडीला येत असताना अक्षय गायकवाड यांच्या प्लॅटिना मोटरसायकल (एमएच 15 डीबी 9670) यांची गाडी विरुद्ध बाजूला वळत असताना जोराची धडक झाली. अपघाताचा आवाज ऐकून पाथरेचे सरपंच मच्छिंद्र चिने, मनोज गवळी यांनी मोबाईल व आधार कार्डचा संदर्भ घेत नातेवाईकांना या संदर्भात कल्पना दिली. अपघातात  जखमी झालेल्या या तिघांनाही तातडीने शिर्डी) येथे सुपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अक्षय जावळे यांचा दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरने सांगितले तर मेजर सचिन गुजर यांच्यावर उपचार सुरू असताना मृत्यू झाला. जखमी अक्षय गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समजते.

Web Title: youth along with a jawan died in a two-wheeler accident

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here