संगमनेर शहरात आणखी एका तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
संगमनेर | Suicide: शहरातील वाडेकर गल्ली येथे राहणाऱ्या १६ वर्षीय मुलाने आत्महत्या केली तसेच कासारा दुमाला येथील २२ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. दोन्ही घटना संगमनेर शहर पोलीस ठाण्यात घडल्या आहेत. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
श्रेयस गणेश वाडेकर वय १६ रा, वाडेकर गल्ली संगमनेर आणि गोकुळ परसराम गडाख वय २२ रा. कसारा दुमाला अशी या मुलांची नावे आहेत.
वाडेकर हा सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास त्याच्या राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. तसेच गडाख हा देखील घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या दोघांच्या आत्महत्या मागील नेमके कारण समजू शकले नाही. याबाबत संगमनेर शहर पोलीस अधिक तपास करीत आहे. घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
Web Title: youth commits suicide by hanging in Sangamner