Home औरंगाबाद युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

Breaking News | Chhatrapati Sambhajinagar: वीट भट्टीवर काम करणाऱ्या एका इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना.

Youth committed suicide by hanging Sambhajinagar

छत्रपती संभाजीनगर : वीट भट्टीवर काम करणाऱ्या एका इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना सोमवारी सकाळी पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली आनंद अशोक वाहुळ (वय ३४, रा. दौलताबाद ता. जि. छत्रपती संभाजीनगर असे नाव आहे. सदर घटना सोमवारी (दि १५) सकाळी तीन वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

पोलिसांनी दिलेल्या माहतीनुसार दौलताबाद येथे असलेल्या वीट भट्टीवर म्हणून काम करीत होता रविवारी रात्री डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मिरवणुकीत सहभागी होऊन रात्री वीट भट्टीवर परत गेला रात्री तीन वाजेच्य सुमारास घरात लावलेल्या लहान बाळाच्या झोक्याची सुती दोरी गळ्याला बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली.

ही घटना त्याची पत्नी प्रियंका हिच्या सकाळी तीन वाजेच्या सुमारास लक्षात आली तिने सदर माहिती गावात राहणारे तिचे सासरे अशोक वाहुळ यांना दिली. अशोक यांनी सदर घटनेची माहिती दौलताबाद पोलीस स्टेशनला दिली. माहिती मिळतात दौलताबाद पोलिस घटनास्थळी धाव घेत त्याला खाली उतरून छत्रपती संभाजीनगर येथे घाटीत रवाना केले वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून आनंद यास मयत घोषित केले दौलताबाद पोलीस स्टेशनमध्ये सदर घटनेची नोंद घेण्यात आली. आनंद याच्या पश्चात, आइ, वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. ९ वर्षापूर्वी आनंदचा भाऊ अमोल याने देखील गळफास लावून आत्महत्या केली होती. आनंद हा कमावता पुरुष होता त्याच्या असे जाण्याने परीवार दुःखाचे डोंगर कोसळले आहे.

Web Title: Youth committed suicide by hanging

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here