Home अकोले अकोलेतील तरुणास एक लाखाची लाच घेताना पकडले

अकोलेतील तरुणास एक लाखाची लाच घेताना पकडले

Breaking News | Akole:  अकोलेतील तरुणास एक लाखाची लाच (Bribe) घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

youth from Akole was caught accepting a bribe of one lakh

अकोले: पुण्यातील जहाँगिर हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना ओंकार भरत जाधव (वय ३२, मूळ रा. अकोले, ता. अकोले) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

पुण्यातील देहूरोड विभाग, पिंपरी-चिंचवड येथील सहायक पोलीस आयुक्त मुगुटलाल पाटील यांच्यासाठी व त्यांच्याच सांगण्यावरून ही रक्कम ओंकार जाधव याने स्वतःच स्वीकारल्याचे समोर आले आहे. यामुळे अकोल्यात यावरुन चर्चा सुरू आहे. सहायक पोलीस आयुक्त मुगुटलाल पाटील हे यापूर्वी अकोले पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्तीवर होते. तर अकोल्यातून झिरो पोलीस म्हणून तत्कालीन अधिकाऱ्यांना मदत करणारी दिवंगत व्यक्ती भरत जाधव यांचा या गुन्ह्यात अटक केलेला ओंकार मुलगा आहे.

एका जागेसंबंधात फसवणुकीचा तक्रार अर्ज होता. सदर तक्रार अर्ज चौकशीसाठी सहायक पोलीस आयुक्त पाटील यांच्याकडे आला होता. संबंधित तक्रार अर्जातील तक्रारदाराविरूद्ध भादंवि. कलम ४२० प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी व या गुन्ह्यात मदत करण्यासाठी ५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी पाटील यांच्या सूचनेवरून खासगी इसम ओंकार जाधव याने केली होती. त्यानुसार सापळा लावून पोलीस उपअधीक्षक नितीन जाधव, पोलीस निरीक्षक प्रसाद लोणार, सहायक फौजदार मुकुंद अयाचित, पोलीस हवालदार चंद्रकांत जाधव, पोलीस नाईक दिनेश माने यांनी पाच लाख रुपयांपैकी पहिला हप्त्याची एक लाख रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले.

Web Title: youth from Akole was caught accepting a bribe of one lakh

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here