Home अहमदनगर अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या तरुणास अटक, मुलीची सुटका

अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या तरुणास अटक, मुलीची सुटका

Ahmednagar News: अपहरण केलेल्या मुलीची सुटका, आरोपीला घेतले ताब्यात.

youth who abducted the minor girl was arrested

श्रीरामपूर | Shrirampur:  शहरातील अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या सराईत आरोपीला शहर पोलिसांनी नगर एमआयडीसी परिसरातून ताब्यात घेतले.

अपहृत मुलीची पोलिसांनी सोडवणूक केली. आरोपीवर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. आरोपीचे नाव मोहसीन जावेद शेख (वय २८, रा. श्रीरामपूर) असे आहे. त्याच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ७ फेब्रुवारीला एका अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या आईने दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी मुलीच्या शोधासाठी पथक नियुक्त केले आहेत.

अपहृत मुलगी ही नगर एमआयडीसीमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर मुलीकडून माहिती घेतली असता अपहरण केल्याचे तिने सांगितले. तिला एका खोलीमध्ये ठेवण्यात आले होते. आरोपीवर दहाहून अधिक गुन्हे दाखल आहेत. पोलिस अधिक तपास करत आहे.

Web Title: youth who abducted the minor girl was arrested

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here