Home संगमनेर संगमनेर ब्रेकिंग: मेन लाईनच्या विजेच्या तारेला धक्का लागून तरुणाचा मृत्यू

संगमनेर ब्रेकिंग: मेन लाईनच्या विजेच्या तारेला धक्का लागून तरुणाचा मृत्यू

Sangamner Breaking: मुख्य विद्युत लाईनच्या विजेच्या तारेला धक्का (Electrick Shock)लागल्याने  तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना (Sakur).

young man died after being struck by a main line electric Shock

संगमनेर: घराच्या इमारतीवर काम करत असताना मुख्य विद्युत लाईनच्या विजेच्या तारेला धक्का लागल्याने  तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवार दि. १६ फेब्रुवारी रोजी दुपारी १२,३० वाजेच्या सुमारास साकूर येथे घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मोहन भिवाजी मोरे (वय ३५) रा. चितळकर वस्ती, साकूर ता. संगमनेर असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.

याबाबत घारगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  साकूर वनवे नगर येथील जावेद अब्दुल शेख यांच्या घराच्या इमारतीवर मोहन भिवाजी मोरे हा तरुण हे आज दुपारी काम करीत होता. यादरम्यान घराजवळूनच गेलेल्या मेन विद्युत लाईनच्या विजेच्या तारेला मोहन मोरे यांचा स्पर्श झाल्याने विजेचा जोरदार धक्का बसला. त्यानंतर तो खाली रस्त्यावर पडल्याने गंभीर जखमी झाला. तातडीने उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, शवविच्छेदनासाठी त्यांचा मृतदेह संगमनेर कुटीर रूग्णालयात पाठविण्यात आला आहे.

याबाबत सुखदेव भिवाजी मोरे यांच्या खबरीवरून घारगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास घारगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. जी. पी लोंढे हे करत आहे.

Web Title: young man died after being struck by a main line electric Shock

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here