अकोले : रोटरी क्लबची नूतन कार्यकारिणी जाहीर
अकोले : रोटरी क्लब अकोलेची सन २०१९-२० या वर्षाची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. अध्यक्षपदी रो. सचिन शेटे, सचिवपदी रो. डॉ. रवींद्र डावरे, उपाध्यक्षपदी रो. प्रवीण झोळेकर व खजिनदारपदी रो. मयूर रासने यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. रोटरी क्लबचे मावळते अध्यक्ष रो. सचिन देशमुख यांनी ही माहिती दिली.
रोटरी क्लब ही आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारी सामाजिक संस्था आहे. दोन वर्षीपूर्वी अकोले येथे रोटरी क्लबची स्थापना करण्यात आली. स्थापनेनंतर प्रथम अध्यक्ष रो. अमोल वैद्य व सचिव रो. सचिन आवारी यांच्या नेतृत्वाखाली अकोले तालुक्यात विविध सामाजिक व विधायक उपक्रम राबविण्यात आले. त्यामुळे या क्लबला पहिल्याच वर्षी ‘बेस्ट न्यू क्लब’ व उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘विशेष प्राविण्य’चा पुरस्कार प्रदान करण्यात आला. दुसऱ्या वर्षी मावळते अध्यक्ष रो. सचिन देशमुख व सचिव रो. सचिन शेटे यांनी सर्व रोगनिदान शिबीर, रक्तदान शिबीर, व्याख्याने, वारकरी आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार आदींसह विविध सामाजिक व विधायक उपक्रम राबविले.
यावर्षी देखील क्लबच्या माध्यमातून सर्व समावेशक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे नूतन अध्यक्ष रो. सचिन शेटे यांनी सांगितले. नूतन अध्यक्ष रो. सचिन शेटे हे अकोले येथील जाणता राजा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष असून प्रतिष्ठानमार्फत अनेक सामाजिक उपक्रम राबविलेलेले आहेत.
अकोले नगरपंचायतीचे नगरसेवक आहेत. गतवर्षी त्यांनी सचिवपद समर्थपणे सांभाळले, तर नूतन सचिव रो. डॉ. रवींद्र डावरे हे जनरल फिजिशियन आहेत. उपाध्यक्ष रो. प्रवीण झोळेकर हे पंकज कृ षी सेवा केंद्र व पंकज मंगल कार्यालयाचे संचालक आहेत, तर खजिनदार रो. मयूर रासने हे वैशाली उद्योग समूहाचे संचालक आहेत. .
सन २०१९-२० या वर्षाकरिता खालील सदस्यांची निवड करण्यात आली. त्यामध्ये क्लब ट्रेनर रो. संदीप मालुंजकर, आयपीपी रो. सचिन देशमुख, सार्जंट ॲट आर्म्स रो. सागर शहा, क्लब ॲडमिन रो. उमेश साबळे, मेंबरशीप डायरेक्टर रो. परशराम शेळके, स्व्हिहस प्रोजेक्ट ग्लोबल रो. डॉ. जयसिंग कानवडे, स्व्हिहस प्रोजेक्ट लोकल रो. नामदेव पिचड, पब्लिक इमेज रो. बाळासाहेब वडजे, युथ स्व्हिहस रो. डॉ. गणेश नवले, डिलिवरी इमपायसिस रो. मयूर रासने, लिटरसी डायरेक्टर रो. प्रा. सुरिंदर वावळे, टीआरएफ रो. गौरव मैड, आरआय इम्फायसिस रो. अभिजित पन्हाळे, बुलेटिन संपादक प्राचार्य रो. विद्याचंद्र सातपुते, आयटी मीडिया रो. सुधीर फरगडे यांची निवड करण्यात आली आहे. नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
Website Title: Latest News Acolyte: Announces New Rotary Club Executive