Home संगमनेर संगमनेर: तरुणीने थेट नदीच्या पुलावरून उडी घेतली अन….. आत्महत्येचा प्रयत्न

संगमनेर: तरुणीने थेट नदीच्या पुलावरून उडी घेतली अन….. आत्महत्येचा प्रयत्न

Sangamner news: घारगावात मुळा नदीच्या पुलावरून एका तरुणीने मुळा नदीच्या कठड्यावर चढत थेट नदित उडी घेत आत्महत्या (Suicide) करण्याचा प्रयत्न, तरुणांच्या सतर्कतेने तिचा जीव वाचविण्यास यश.

Young woman jumped directly from the bridge of the river and attempted suicide

संगमनेर:  संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावर घारगावात मुळा नदीच्या पुलावरून एका तरुणीने मुळा नदीच्या कठड्यावर चढत थेट नदीत उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, परंतु सुदैवाने तरुणांच्या सतर्कतेने तिचा जीव वाचविण्यास यश आले. सोमवार (दि. १०) रोजी मुळा नदीच्या पुलाच्या कठड्यावर एक तरुणी उभी असताना महामार्गावरून जा-ये करणाऱ्यांनी तिला पाहिले, परंतु तरुणीने पुलाच्या कठड्यावरून थेट नदीच्या प्रवाहात उडी घेतली. आजूबाजूच्या नागरिकांना सदर घटनेची माहिती मिळाली असता घारगाव येथील तरुणांनी नदीच्या दिशेने धाव घेत सुमारे पाचशे मिटरवर पोहचलेल्या या तरुणीला पाण्यातून बाहेर काढण्यात यश मिळविले. घारगाव येथील तरुणांनी सतर्कता दाखवत तिला वाचविले.

खासगी रुग्णवाहिकेतून तरुणीला पुढील उपचारासाठी आळेफाटा येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. या तरुणीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न का ? व कशासाठी केला? हे मात्र अद्याप पर्यंत समजू शकले नसल्याचे सांगण्यात आले आहे. तरुणांनी स्वतःची पर्वा न करता नदीतून तरुणीला बाहेर आणून तिचे प्राण वाचविल्याबद्दल त्यांच्यावर गावकऱ्यांसह परिसरातील नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. तरुणांनी वेळीच सावधानता व सतर्कता दाखविली नसती तर कदाचित मोठा अनर्थ घडला असता.

Web Title: Young woman jumped directly from the bridge of the river and attempted suicide

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here