Home महाराष्ट्र १०वी १२वी च्या परीक्षा पुढे ढकलल्या, या महिन्यात होणार परीक्षा

१०वी १२वी च्या परीक्षा पुढे ढकलल्या, या महिन्यात होणार परीक्षा

10th 1 th Board Exam 2021 postponed

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. १० वी व १२ वी विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहे. अगोदरच अभ्यासाचा तणाव आणि वाढणारी रुग्णसंख्या यामुळे चिंतेचा विषय होता.

करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकारने १० वी व १२ वीच्या परीक्षा पुढे घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यांसंदर्भात व्हिडियो ट्वीट केला आहे.

परीक्षा किती तारखेला घेण्यात येतील हा निर्णय राज्यसरकारने घेतला नाही मात्र १२ वीच्या मे अखेर तर १० वीच्या जून महिन्यात परीक्षा घेण्यात येतील. नियोजन करून त्या तारखा जाहीर केल्या जातील असे मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.  १० वी आणि १२ वी च्या विद्यार्थ्यांचे आरोग्य ही आमची प्राथमिकता आहे. 

Web Title: 10th 1 th Board Exam 2021 postponed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here