Home पुणे Rape | धक्कादायक! १२ वर्षीय मुलीला लॉजवर नेऊन बलात्कार

Rape | धक्कादायक! १२ वर्षीय मुलीला लॉजवर नेऊन बलात्कार

12-year-old girl rape in lodge

Pimpri | पिंपरी: ओळख निर्माण करून १२ वर्षीय मुलीला लॉजवर नेऊन बळजबरीने अत्याचार (Rape) केल्याची घटना २० मे २०२२ ते २० जून २०२२ या कालावधीत शुभम लॉज स्टेशन चौक तळेगाव दाभाडे येथे घडली.

याप्रकरणी मुलीच्या आईने मंगळवारी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. यावरून आरोपी सौरभ छगन चव्हाण वय २३ रा. तळेगाव दाभाडे याला अटक करण्यात आली आहे.

आरोपी सौरभ याचे नातेवाईक फिर्यादी यांच्या शेजारी राहत असल्याने आरोपीचे सारखे येणे जाणे असायचे यातूनच आरोपीने अल्पवयीन मुलीशी ओळख निर्माण केली. त्यानंतर आरोपी याने फिर्यादी यांची परवानगी न घेता मुलीला लॉजवर घेऊन गेला आणि जबरदस्तीने शारीरिक संबध ठेवले. तसेच मुलीला व फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली.

Web Title: 12-year-old girl rape in lodge

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here