Home महाराष्ट्र एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, देवेंद्र फडवणीस मंत्रिमंडळाबाहेर राहणार  

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, देवेंद्र फडवणीस मंत्रिमंडळाबाहेर राहणार  

Eknath Shinde new main Minister of maharashtra 

मुंबई: राज्यातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे राज्याचे पुढील मुख्यमंत्री असतील अशी घोषणा देवेंद्र फडवणीस यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे. एकनाथ शिंदे यांना भाजपचे पूर्ण समर्थन असेल आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील असे फडवणीस यांनी सांगितले. आज संध्याकाळी ते एकटेच मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे.   

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे तसेच भाजपच्या इतर नेत्यांनी आज, गुरुवारी राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यात देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली. एकनाथ शिंदे यांना भाजप समर्थन देणार असून, ते राज्याचे पुढील मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा फडणवीस यांनी यावेळी केली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्ही सत्तेच्या पाठीमागे नाहीत. मुख्यमंत्रिपदासाठी काम करत नाही. ही तत्वांची लढाई आहे. ही हिंदुत्वाची लढाई आहे. विचारांची लढाई आहे. म्हणून एकनाथ शिंदे यांना भाजप समर्थन देईल आणि एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री असतील, असा भाजपने निर्णय घेतला आहे.

यावेळी बोलताना ते म्हणाले, आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात विधीमंडळ गट आणि १६ अपक्ष आमदारांचा मोठा गट सोबत आला आहे. याबाबतचे पत्र आपण राज्यपालांना दिलं आहे. ही हिंदुत्वाची लढाई असून भारतीय जनता पक्षाने हा निर्णय घेतला आहे की, भारतीय जनता पार्टीचे समर्थन एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री होतील आणि त्यांचा आज रात्रीचं ७.३० वाजता शिंदे यांचा एकट्याचा शपथविधी होणार असल्याचं जाहीर केलं. तर आपण मंत्रीमंडळाबाहेर राहणार असल्याचं जाहीर केलं.

Web Title: Eknath Shinde new main Minister of maharashtra 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here