Home पुणे Murder: निवृत्त पोलीस महानिरीक्षकाच्या मुलाचा खून

Murder: निवृत्त पोलीस महानिरीक्षकाच्या मुलाचा खून

Murder of retired Inspector General of Police's son

Pune | पुणे : ओबगावमधील बारच्या  पार्किंगमधील गाडी काढण्यावरून झालेल्या वादात चौघांनी बेदम मारहाण करून नरेंद्र रघुनाथ खैरे (३३) याचा निर्घृण खून (Murder) केला. हा प्रकार सोमवार, २७ जूनच्या पहाटे घडला. नरेंद्र हा सेवानिवृत्त पोलीस महानिरीक्षक रघुनाथ खैरे यांचा मुलगा आहे. त्याच्या खुनासंदर्भात आठ जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

युवराज जंबू कांबळे (२०), ओंकार अशोक रिठे (२४), वैभव पोपट अदाटे (२४), मनोज दत्तात्रय सूर्यवंशी (२४) आणि विष्णू कचरू कदम (२५) ही अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे घडली. आहेत. त्यांना तपासासाठी पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. या आरोपींचे अन्य तीन साथीदार फरारी झाले आहेत. पोलिसांनी त्यांचा तपास जारी केला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. ही घटना रविवार, २६ जून सायंकाळ ते सोमवारी तो गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर सकाळदरम्यान आंबेगाव बुद्रुकमधील न्यू प्यासा बारसमोरील पार्किंगच्या जागेत घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी या बार मध्ये मद्यप्राशनासाठी गेले होते. नरेंद्रही तेथे होता. तेथून बाहेर पडताना पार्किंगमधील गाडी काढण्यांच्या वादातून नरेंद्रची या टोळक्याशी वादावादी झाली. त्यावेळी चौघांनी त्याला बेदम मारहाण केली. नाजूक भागावर मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला होता.

त्यानंतर आरोपींच्या तीन अन्य साथीदारांनी त्याला उचलून आंबेगाव बुद्रकमधील श्री साई मोटर्समध्ये नेऊन ठेवले. वेळेवर उपचार न मिळाल्याने नरेंद्र मरण पावला. श्री साई मोटर्समध्ये मंगळवार, २८ जूनला सकाळी एक मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी पोहोचले.. त्यांनी तेथील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यावर या सर्व प्रकाराचा उलगडा झाला. यासंदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर तपास करत आहेत.

Web Title: Murder of retired Inspector General of Police’s son

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here