Home महाराष्ट्र खळबळजनक: २४ वर्षीय विवाहितेने तीन वर्षाच्या चिमुकलीसह रेल्वेतून उडी फेकत आत्महत्या

खळबळजनक: २४ वर्षीय विवाहितेने तीन वर्षाच्या चिमुकलीसह रेल्वेतून उडी फेकत आत्महत्या

24-year-old married woman committed suicide by jumping from a train 

Aurangabad | औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात हृदयद्रावक घटना घडली आहे.सासरच्या जाचास कंटाळून एका २४ वर्षीय विवाहितेने आपल्या तीन वर्षाच्या चिमुकलीला रेल्वेतून फेकत आत्महत्या (Suicide) केली. पूनम गणेश विसपुते असे या विवाहितेचे नाव आहे. पती आणि सासूच्या छळास कंटाळून पूनमने रेल्वेने जात असताना शांभवी या तीन वर्षांच्या चिमुकलीला रेल्वेतून बाहेर फेकून स्वतःही रेल्वेतून उडी मारली. या घटनेने औरंगाबाद जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

उडी मारण्यापूर्वी तिने भावाला व पतीला पाठवलेल्या मेसेजमध्ये ‘सासूबाई, पोराला आता तरी मांडीवरून खाली उतरवा आणि दुसरे लग्न करताना त्या मुलीला फसवू नका,’ असे म्हटले आहे.

नाथनगरात माहेर असलेल्या पूनमचे २०१८ मध्ये नाशिक जिल्ह्यातील गणेशसोबत लग्न झाले होते. गणेश गुजरातमधील नवसारी येथील एका कंपनीत कामाला आहे. सासरच्या छळाला कंटाळून ती सहा महिन्यांपूर्वी आईकडे आली होती. शुक्रवारी पहाटे पाच वाजता गणेश व सासरची मंडळी औरंगाबादला आली. मात्र, त्या अगोदरच पूनम शंभवीला घेऊन घराबाहेर पडली होती. तिची शोधाशोध सुरू असतानाच लासूर स्टेशन-पोटूळ रेल्वे स्टेशनदरम्यान एक महिला व मुलीचा मृत्यू झाल्याचे समोर आल्याने हा प्रकार समोर आला.

Web Title: 24-year-old married woman committed suicide by jumping from a train 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here