Home महाराष्ट्र Heat Wave:  राज्यातील १२ जिल्ह्यात पुढील तीन दिवस यलो अलर्ट, नगरचा समावेश

Heat Wave:  राज्यातील १२ जिल्ह्यात पुढील तीन दिवस यलो अलर्ट, नगरचा समावेश

Heat Wave Yellow alert for next three days in 12 districts 

पुणे | Pune:  राज्यात पुढील 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा (Heat wave) इशारा हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यातील 12 जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील तीन दिवस महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा, अशा सूचना हवामान विभागाने नागरिकांना दिल्या आहेत. याबाबत पुणे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ के.एस. होसाळीकर यांनी ही माहिती दिली आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमानात वाढ होत आहे. या वाढत्या तापमानामुळे सर्वसामान्य नागरिक  त्रस्त होत आहे. राज्यात बऱ्याच ठिकाणी तापमान 40 अंशांच्याही पुढे गेले आहे. वाढत्या तापमानाचा परिणाम शरीरावर व आरोग्यावर होताना दिसून येत आहे.

दोन दिवसांत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान चांगलेच वाढले आहे. पुढील तीन दिवस राज्यातील अनेक पुढील तीन दिवस या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट:

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर, जळगाव, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, अकोला, भंडारा या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यावरून मराठवाड्यासह कोकण, पश्चिम महाराष्ट्रात आणि विदर्भात उष्णतेचा चटका वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title: Heat Wave Yellow alert for next three days in 12 districts 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here