Gunratna Sadawarte: गुणरत्न सदावर्तेंना इतक्या दिवसांची पोलिस कोठडी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानावर झालेल्या हल्ला प्रकरणानंतर मुंबई पोलिसांनी वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadawarte) यांना अटक करण्यात आली. सदावर्ते यांच्यासह ताब्यात घेतलेल्या १०० हून अधिक आंदोलनकर्त्यांना आज शनिवारी मुंबईतील किल्ला कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी सदावर्ते यांना कोर्टाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. अन्य १०९ संशयित आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
काल, शुक्रवारी एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या घराबाहेर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनावेळी काहींनी चपला फेक व दगडफेक केली. या आंदोलनात सहभागी झालेल्यांना सदावर्तेंनी चिथावणी दिल्याचा आरोप आहे. मुंबई पोलिसांनी काल संध्याकाळी सदावर्तेंना त्यांच्या घरातून ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी केल्यानंतर गुन्हा नोंदवून अटक केली. अटकेनंतर आज, शनिवारी सदावर्ते यांच्यासह ताब्यात घेतलेल्या शंभरहून अधिक आंदोलकांना किल्ला कोर्टात हजर केलं.
या प्रकरणावर किल्ला कोर्टात सुनावणी झाली. यावेळी सरकारच्या वतीनं सरकारी वकील प्रदीप घरत यांनी युक्तिवाद केला. आरोपींवरील कलम गंभीर असून, त्यांना कोठडी द्यावी, अशी मागणी घरत यांनी केली. त्यानंतर कोर्टानं सदावर्ते यांच्यासह आंदोलक कर्मचाऱ्यांना कोठडी सुनावली. पवार यांच्या घरावर हल्ला करण्यासाठी गेलेल्यांमध्ये खरोखरच एसटी कर्मचारी होते की काही भाडोत्री लोक यात घुसविण्यात आले होते, याचा तपास करण्यासाठी १४ दिवसांची कोठडी मिळण्याची मागणी त्यांनी केली.
Web Title: Gunratna Sadawarte has been in police custody