Home अकोले अभिनव मध्ये यापुढे कोर्सेस सुरू करण्यासाठी प्रस्ताव आल्यास मान्यता देण्यासाठी हिरिरीने पुढाकार...

अभिनव मध्ये यापुढे कोर्सेस सुरू करण्यासाठी प्रस्ताव आल्यास मान्यता देण्यासाठी हिरिरीने पुढाकार घेण्यात येईल – डॉ. धनंजय माने

अभिनव मध्ये यापुढे कोर्सेस सुरू करण्यासाठी प्रस्ताव आल्यास मान्यता देण्यासाठी हिरिरीने पुढाकार घेण्यात येईल – डॉ. धनंजय माने

अकोले प्रतिनिधी- अभिनव शिक्षण संस्थेमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा आहे त्यामुळे अभिनव मध्ये यापुढे कोर्सेस सुरू करण्यासाठी प्रस्ताव आल्यास मान्यता देण्यासाठी हिरिरीने पुढाकार घेण्यात येईल असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे विभागीय संचालक डॉ. धनंजय माने यांनी केले.

You May Also Like: Bollywood Actresses Priyanka Chopra, Mallika successful adult Movie

अकोले येथील अभिनव कॉलेज ऑफ सायन्स मध्ये मुक्त विद्यापीठाच्या बी ए मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम कोर्सचे उदघाटन डॉ.धनंजय माने यांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव नवले होते या वेळी विद्यापीठाचे अधिकारी संतोष साबळे, राजेश आहेर , शेतकरी नेते दशरथराव सावंत, भाऊसाहेब मंडलिक,बुवासाहेब नवले पतसंस्थेचे उपाध्यक्ष रमेशराव जगताप, अभिनव शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष भाऊसाहेब नाईकवाडी ,मंदाताई नवले, , सह सचिव विक्रम नवले,रामकृष्ण नवले,भास्करराव दराडे, बुवासाहेब नवले मल्टीस्टेट चे उपाध्यक्ष प्रमोद रासने, विठ्ठ्लमामा नाईकवाडी , सुजाता ऑफसेट चे संचालक सुजित नवले प्राचार्या दीप्ती शेटे, केंद्र संयोजक प्रा. अनिल बेंद्रे, सर्व विभागांचे प्राचार्य, विभागप्रमुख आदींसह ,शिक्षक कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीत व विद्यापीठ गीताने झाली.
डॉ. माने पुढे म्हणाले की,अभिनव विज्ञान महाविद्यालयात विद्यापीठाचे कोर्सेस देण्यात यावे किंवा नाही याबाबत शंका मनात होती मात्र निरीक्षणाची येथील शैक्षणिक वातावरण पाहून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बी ए मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम या कोर्सला मान्यता देण्यात आली. जी संस्था अभिनव या नावाने चालू आहे व जेथे वेगवेगळ्या पद्धतीचे शिक्षण देण्यात येत आहे, अशा शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थी संख्या 66 वरून 3125 वर गेलेली आहे, या संस्थेत या कोर्सचे उद्घाटन जाहीर करीत आहे. अभिनव संस्थेने यापुढे मुक्त विद्यापीठाचे कोर्सेस साठी प्रस्ताव पाठविल्यास ते मंजूर करण्यासाठी हिरीरीने पुढाकार घेईल. मुक्त विद्यापीठ हे मास युनिव्हर्सिटी असून देशांमधील 14 पैकी एक आहे ,पारंपारिक विद्यापीठापेक्षा या विद्यापीठात विद्यार्थी संख्या जास्त आहे आठ विद्याशाखा व त्यांचे 220 वेगवेगळे अभ्यासक्रम विद्यापीठामार्फत चालवले जातात.

नोकरदार वर्ग आणि सेवानिवृत्त झालेले नागरिक विशेषतः महिलांनी विद्यापीठाच्या कोर्सेसचा जास्त लाभ घेतलेला आहे . ज्यांना शिक्षण घेणे परवडत नाही अशा साठी मधुकरराव नवले यांनी अभिनव या माध्यमातून विद्यापीठाचे कोर्सेस सुरू करून शैक्षणिक सुविधा निर्माण करून द्यावी. ज्या व्यक्ती स्वतःसाठी नाही तर दुसर्यांसाठी समाजामध्ये काम करतात त्यांची नोंद इतिहास घेतल्याशिवाय राहणार नाही असे मधुकरराव नवले यांच्या विषयी गौरवोद्गार काढले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते अभिनव अक्षरवाणी या दीपावली विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले
कार्यक्रमाचे अध्यक्ष दशरथराव सावंत यांनी शिक्षणाविषयी खंत व्यक्त करताना म्हणाले की जगामध्ये शैक्षणिक गुणवत्तेबाबत दोनशे विद्यापीठामध्ये आपला नंबर लागत नाही. अभिनव च्या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्तेबाबत ही झेप घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली. ज्याच्याकडे व्हिजन आहे तेच देशासाठी काहीतरी करू शकतात, अभिनव संस्थेला संधी मिळाली तर ते हे शक्य करू शकतील. आज काही शिक्षण संस्था डिग्री वाटण्याचे काम करीत आहे त्यामुळे टॅलेंट ची व्याख्या करता येत नाही. युवकांसाठी आपले टॅलेंट सिद्ध करण्यासाठी अनेक क्षेत्र आहेत त्यामध्ये पत्रकारिता हे क्षेत्र आपल्या सामाजिक जडणघडणीसाठी उपयुक्त आहे, त्याचा लाभ युवकांनी घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. आपल्या अध्यक्षीय भाषणात अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव नवले म्हणाले की, ,आपण लावलेल्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झालेले पाहून मनस्वी आनंद होत आहे मुक्त विद्यापीठाचा कोर्स सुरु करण्यासाठी डॉ. धनंजय माने संतोष साबळे व प्रा.अनिल बेंद्रे यांचे मोठे योगदान असून या पत्रकारितेच्या कोर्समधून सामाजिक न्यायाचा झेंडा घेणारे अनेक पत्रकार तयार होतील यात शंका नाही. प्रवाहाच्या विरोधात जाण्याची ताकद पत्रकारितेच्या क्षेत्रात आहे लेखणीचे हत्यार उपसले की अनेक सामाजिक प्रश्न मार्गी लागतात, अभिनव शिक्षण संस्थेमध्ये गुणवत्तेचा बेस वअॅक्टिविटी बेस वर आधारित शिक्षण पद्धती आहे. गरजांची पूर्तता करून पुढे जाण्याचा निर्धार केल्याने इथपर्यंत मजल मारता आली अजून बरीच शैक्षणिक कामे अपूर्ण असून ती पूर्ण करण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे .
यावेळी विद्यापीठाचे अधिकारी संतोष साबळे यांनी पत्रकारितेविषयी माहिती दिली या क्षेत्रात सामाजिक काम करण्याची मोठी संधी असल्याचे सांगितले. 
,स्वागत व प्रास्ताविक प्राचार्या दीप्ती शेटे यांनी केले,सुत्रसंचालन कुसुम वाकचौरे आणि प्रा. सचिन उगले यांनी केले. कार्यक्रमाची सांगता अभिनव कला अकॅडेमीचे प्राचार्य इंद्रभान कोल्हाळ यांच्या सुश्राव्य आवाजात पसायदान गावून झाली .

Website Title: Abinav College Akole Inauguration of Mass Communication and Journalism Course


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा



प्रमोटेड बातम्या:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here