Home क्राईम संगमनेर प्रवरा नदी पात्रात महिलेवर अत्याचार, नवऱ्याची दारू सोडायची असेल तर प्रवरा...

संगमनेर प्रवरा नदी पात्रात महिलेवर अत्याचार, नवऱ्याची दारू सोडायची असेल तर प्रवरा नदीपात्रात फेरी मारावी लागेल अन….

Sangamner Crime: दारूच्या व्यसनापासून सोडवण्यासाठी गैरफायदा घेत बळजबरीने अत्याचार करून पळून गेल्याची घटना.

Abuse of women in Sangamner Pravara river 

संगमनेर: दसऱ्याच्या दिवशीच अंधश्रद्धा व महिलेवर अत्याचाराची घटना समोर आली आहे.  या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.  नवऱ्याला दारूच्या व्यसनापासून सोडवण्यासाठी कुटुंबीय आणि पत्नी देखील खूप प्रयत्न करीत असतात अशाच एका पत्नीने नवऱ्याची दारू सोडावी म्हणून एकाकडे उपाय मागितला तर त्याने त्याच्या असाहाय्यतेचा गैरफायदा घेत तिच्यावर बलात्कार करून पळ काढल्याची घटना संगमनेर मध्ये प्रवरा नदी पात्रात घडली आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, एका महिलेच्या पतीचे दारू व्यसन सुटत नव्हते म्हणून ‘तुझ्या नवऱ्याची दारू सोडायची असेल तर प्रवरा नदीपात्रात फेरी मारावी लागेल’ असे त्या महिलेला पटवून देऊन आरोपी तिच्यासोबत नदीपात्रात गेला. नदी पात्रात गेल्यानंतर सदर आरोपीने पीडित महिलेस कपडे काढण्यास सांगितले. महिलेने अंगावरील साडी काढली. त्यावेळी आरोपीने लिंबू आणि नारळ हे नदीपात्रात जमिनीवर ठेवून त्याला फेरी मारण्यास सांगितले. लिंबू आणि नारळाला फेरी मारत असतानाच आरोपीने आजूबाजूला कोणी नाही याचा गैरफायदा घेत बळजबरीने अत्याचार करीत बलात्कार करून पळून गेल्याची घटना घडली आहे. महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे नाव पप्पू आव्हाड असे असून तो संगमनेर तालुक्यातील रहिवासी आहे. आरोपी सध्या फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे.

Web Title: Abuse of women in Sangamner Pravara river 

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here