Home अहमदनगर अहमदनगर: दोन दुचाकींची समोरासमोर धडक, अपघातात बापलेकीचा मृत्यू

अहमदनगर: दोन दुचाकींची समोरासमोर धडक, अपघातात बापलेकीचा मृत्यू

Ahmednagar | Shevgaon  News:  दोन मोटारसायकलच्या समोरासमोर धडकेत बाप लेकीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना.

Two bikes collided head-on, Bapleki died in the accident

शेवगाव: शेवगाव-गेवराई राज्य मार्गावरील चापडगाव  शिवारात दोन मोटरसायकलच्या समोरासमोर झालेल्या धडकेत बापलेकीचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी मंगळवारी (दि.24) ऐन दसर्‍याच्या दिवशी घडली. यात आखेगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व त्यांच्या मुलीचा समावेश आहे. अशोक विक्रम उगले (40) व त्यांची मुलगी गौरवी उर्फ अवणी अशोक उगले (10, रा. बेलगाव, ता. शेवगाव) अशी या अपघातातील मयत झालेल्यांची नावे ओहत

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  तालुक्यातील बेलगाव येथे उगले परिवाराने गावात देवीचे मंदिर बांधले असून मंगळवारी दसर्‍याचे दिवशी देवीच्या मुर्तीची प्राण प्रतिष्ठा कार्यक्रम आटोपून मयत अशोक उगले हे आपली पत्नी, मुलगा व मुलगी यांचेसह मोटरसायकलवरून शेवगाव-गेवराई महामार्गाने शेवगावकडे निघाले होते. चापडगाव  शिवारात समोरून भरधाव येणार्‍या मोटरसायकलने त्यांच्या मोटरसायकलला जोरात धडक दिली. त्यात अशोक उगले व मुलगी गौरी हे दोघे गंभीर जखमी झाले तर पत्नी व मुलगा यांना देखील जखमी झाले होते.

त्यांना अहमदनगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असतांना अशोक उगले यांचा उपचार सुरु असतांना मंगळवारी रात्री 11 चे सुमारास तर मुलगी गौरी हीचा आज बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास मृत्यू झाला. . ऐन दसर्‍याच्या दिवशी घडलेल्या या अपघाताच्या घटनेमुळे तालुक्यात शोककळा पसरली आहे.

Web Title: Two bikes collided head-on, Bapleki died in the accident

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here