Home नागपूर लग्न करतो म्हणत अत्याचार, वडिलांना पाठवले व्हिडीओ

लग्न करतो म्हणत अत्याचार, वडिलांना पाठवले व्हिडीओ

Breaking News | Ahmednagar: १६ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून संशयित आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. तिने लग्नाबाबत विचारले असता वाद घालत थेट तिच्या वडिलांनाच व्हिडीओ पाठविला.

abused saying he is getting married, video sent to father

नागपूर: एका १६ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून संशयित आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. तिने लग्नाबाबत विचारले असता वाद घालत थेट तिच्या वडिलांनाच व्हिडीओ पाठविला, शांतीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

प्रज्योत हरिहर बंडोले (२०, रा. शांतीनगर) असे आरोपीचे नाव आहे. १६ वर्षीय मुलीशी त्याने प्रेमसंबंध निर्माण केले. त्याने तिला लग्नाचे वचन दिले. २४ नोव्हेंबर २०२३ ते ४ मार्च या कालावधीत त्याने तिच्यावर अत्याचार केला, त्याचे त्याने फोटो व व्हिडीओ चित्रण केले. त्यानंतर त्यांचा वाद झाला असता व्हिडीओ व फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. इतक्यावरच तो थांबला नाही तर त्याने मुलीच्या वडिलांना व्हिडीओ पाठविले. मुलीच्या आईने शांतीनगर पोलिस ठाणे गाठत तक्रार केली. पोलिसांनी पोक्सो तसेच आयटी अॅक्टअंतर्गत गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केली आहे.

Web Title: abused saying he is getting married, video sent to father

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here