Home अहमदनगर अहमदनगर: खोली बघण्याच्या बहाण्याने महिलेस खोलीवर नेऊन अत्याचार

अहमदनगर: खोली बघण्याच्या बहाण्याने महिलेस खोलीवर नेऊन अत्याचार

Abusing women by taking them to the room under the pretext of looking at the room

Ahmednagar | अहमदनगर: अहमदनगर शहरातील एका उपनगरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वयंपाक कामासाठी खोली बघण्याच्या बहाण्याने ४२ वर्षीय महिलेला खोलीवर नेऊन तिच्याविरुद्ध जबरदस्तीने अत्याचार (abusing) केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पिडीत महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. यावरून विजय दशरथ शेजवळ वय ४२ तपोवन रोड, सावेडी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून न्यायालयाने ३० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  फिर्यादी स्वयंपाकाचे काम करतात. त्यांना स्वयंपाकाचे काम करण्यासाठी खोली आवश्यक होती. 27 जून रोजी विजय शेजवळ याने फिर्यादीला स्वयंपाकाचे काम करण्याकरीता खोली बघून जाण्याकरीता घेवून गेला. विजय शेजवळ याने त्यांना खोलीमध्ये नेऊन बळजबरीने तिच्या मनाविरूध्द अत्याचार केला.

या प्रकरणी तोफखाना पोलिसांत पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून विजय शेजवळ याच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली. तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक विश्वास भान्सी यांच्या पथकाने शेजवळ याला अटक केली आहे.

Web Title: Abusing women by taking them to the room under the pretext of looking at the room

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here