Home अकोले संगमनेर अकोले रस्त्यावर पिकअप मोटारसायकल यांच्यात भीषण अपघात, अकोलेतील दोघे ठार

संगमनेर अकोले रस्त्यावर पिकअप मोटारसायकल यांच्यात भीषण अपघात, अकोलेतील दोघे ठार

Sangamner Accident News:  डेरेवाडी फाटा येथे पिकअप व मोटारसायकल यांच्यात भीषण अपघात,  पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल.

accident between pickup motorcycle, two killed in Akole

संगमनेर: संगमनेर अकोले रस्त्यावरील डेरेवाडी फाटा येथे पिकअप व मोटारसायकल यांच्यात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात मोटरसायकल वरील दोघे जागीच ठार झाले आहेत. याप्रकरणी पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, संदीप खंडू माने (वय ३८) व भरत बाबुराव कराळे (वय ५६) (रा.तांभोळ, ता. अकोले) असे मयतांची नावे आहेत. संदीप माने व भरत कराळे हे दोघे जण मोटारसायकलवर संगमनेरकडून डेरेवाडी फाट्याकडे चालले होते.

याचवेळी अकोल्याहून संगमनेरकडे भरधाव वेगाने येणार्‍या पिकअप जीप क्रमांक एम.एच.१५ एफ व्ही. ९४३४ हिने मोटारसायकलला समोरुन जोराची धडक दिली. या धडकेत मोटारसायकलवरील संदीप खंडू माने व भरत बाबुराव कराळे हे जागीच ठार झाले. याप्रकरणी देवराम बाबुराव माने (रा.तांभोळ, ता.अकोले) यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दरम्यान, पोलिसांनी (Police) चालक कैलास नामदेव सदगिर (रा.मुथाळणे, ता. अकोले) याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३०४,२७९,३३७, ३३८,४२७, व मोटारवाहन कायदा कलम १७७ व १८४ अन्वये गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार व्ही.जी.खाडे करत आहे.

Web Title: accident between pickup motorcycle, two killed in Akole

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here