Home अकोले राजूर पोलिसांची कामगिरी: फरार आरोपीस अटक

राजूर पोलिसांची कामगिरी: फरार आरोपीस अटक

Accident Crime Rajur police performance Fugitive accused arrested 

राजूर | Accident: अकोले तालुक्यातील चिंचोडी गावाजवळील अपघातात मोटारसायकलवरील ३ युवकांना धडक देत वाहनासह फरार झालेल्या पिक अप चालकाच्या मुसक्या राजूर पोलिसांनी आवळल्या आहेत. या कामगिरीने राजूर पोलिसांचे अभिनंदन होत आहे.

याबाबत माहिती अशी की, अकोले तालुक्यातील चिंचोडी जवळील वाकी रस्त्यावर झालेल्या अपघातात एका तरुणाचे जागेवरच निधन झाले होते. तर दोन जण गंभीर जखमी झाले होते. पिकअप या वाहनाने धडक देत चालक पिक अप सह फरार झाल्याचे सांगण्यात आले होते. राजूर पोलिसांसमोर पिक अप चालकाचा शोध लावणे एक आव्हान होते.

राजूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण थोरात व सहकाऱ्यांनी त्याच दिवशी रात्री उशिरापर्यंत पिक अप वाहनाचा शोध सुरु ठेवला. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत प्रयत्न केला. त्यावेळी वनविभागाच्या टोलनाक्यावरून घाटघरच्या दिशेने ५ वाजून २७ मिनिटांनी एम,एच.१७ ए.जी. ६८४२ या क्रमांकाचे पिकअप वाहन गेल्याचे दिसून आले. त्या पिकअप वर संशय बळावल्याने पिक अपच्या नंबरवरून पिक अपच मालक शोधात त्याची चौकशी केली असता या पिक अप चालकाने आपणच तिघांना उडविले असल्याची कबुली दिली. राजूर पोलिसांनी पिकप चालक दातीर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास राजूर पोलीस करीत आहे.  

Web Title: Accident Crime Rajur police performance Fugitive accused arrested 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here