Home Accident News Accident: वीज कंत्राटी कर्मचार्‍याचा अपघाती मृत्यू

Accident: वीज कंत्राटी कर्मचार्‍याचा अपघाती मृत्यू

Accident death of an electrical contract employee

सोनई  | Sonai Accident:  शनिशिंगणापूर महावितरणच्या उपकेंद्रात कंत्राटी पध्दतीने असलेल्या बाह्यस्रोत कर्मचारी जगदीश काकासाहेब चांदघोडे(वय-30)  यांचा घरातील जिन्यावरून घसरून पडल्याने अपघाती (Accident) मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी रात्री घडली. या दुर्दैवी घटनेने परिसरात शोक व्यक्त होत आहे.

गुरुवारी रात्री कामावर जाण्याच्या घाई गडबडीत घरातील जिन्यावरून ते खाली पडले. यामध्ये ते गंभीर जखमी झाल्याने चांदघोडे यांना रुग्णालयात नेले असता उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी व दोन वर्षांची मुलगी आहे. या घटनेने सोनई गाव व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Accident death of an electrical contract employee

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here