Home क्राईम Rape Case: भोंदू बाबाने महिलेवर बलात्कार करुन 20 लाखाची फसवणूक

Rape Case: भोंदू बाबाने महिलेवर बलात्कार करुन 20 लाखाची फसवणूक

Pimpri Chinchwad, Bhondu Baba was arrested for rape a woman and fraud

पिंपरी-चिंचवड: पिंपरी येथे धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घरावर काळी जादू झाल्याचे सांगत महिलेवर बलात्कार (Rape)  करून 20 लाखांची फसवणूक (Fraud) करणाऱ्या भोंदू बाबाला पोलिसांनी अटक केली आहे.

विनोद शंकर पवार असे अटक केलेल्या भोंदू बाबाचे नाव आहे. पीडित महिलेच्या घरात सतत कटकटी होत असल्याने कटकटी थांबवण्यासाठी उपाय म्हणून ही महिला या भोंदू बाबाकडे जात होती. विनोद पवार हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध सांगली आणि वाकड येथील पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास रावेत पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक गायकवाड करीत आहेत.

पीडित महिलेच्या घरी दररोज कटकटी होत असल्याने यांबाबत महिलेने भोंदू बाबाला सांगितले. त्यानंतर आरोपीने महिलेला आपण जादूटोणा आणि अघोरी विद्येचे काम करत असून मला आपल्या घरी येऊन पहावे लागेल असे सांगितले. त्यानुसार आरोपीने महिलेच्या घरी जाऊन पाहणी केली असता महिलेला तिच्या घरावर काळी जादू केलेली असल्याने असे प्रकार घडत आहेत.  सात ते आठ महिन्यापर्यंत पती जगणार असल्याचे सांगितले. यासाठी तांत्रिक विधीकरीता 30 हजार रुपये घेऊन अघोरी पूजा केली. त्यानंतर महिलेला काळ्या जादूची भिती दाखवत पतीकडून 20 लाख रुपये घेऊन येण्यास सांगितले. पैसे घेऊन आल्यानंतर तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार (Rape) केला.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सदर महिलेने पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे तक्रार अर्ज केला. याप्रकरणी अधिक  तपास रावेत पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक गायकवाड करीत आहेत.

Web Title: Pimpri Chinchwad, Bhondu Baba was arrested for rape a woman and fraud

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here