Home अहमदनगर तरुणाने केला २१ वर्षीय विवाहितेचा विनयभंग

तरुणाने केला २१ वर्षीय विवाहितेचा विनयभंग

Young man Molestation a 21-year-old married woman

Ahmednagar | राहुरी  | Rahuri: घराकडे जात असलेल्या 21 वर्षीय विवाहित तरुणीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. राहुरी तालुक्यातील माहेगाव येथे दि.10 मार्च रोजी ही घटना घडली. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात सचिन चव्हाण याच्या विरोधात विनयभंगाचा (Molestation) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुरी तालुक्यातील माहेगाव येथील एक विवाहित तरूणी दि. 10 मार्च रोजी सहा वाजे दरम्यान बाथरूमला गेली असता ती घराकडे परत येत असताना आरोपी तिच्या पाठीमागून आला. त्याने तिला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करु लागला. तेव्हा त्या तरूणीने जोरात आरडाओरड केली. तेव्हा तिचा पती तेथे पळत आला. त्याला येत असल्याचे पाहून आरोपीने त्या तरूणीला खाली पाडून तिच्या अंगावर पाय देऊन तेथून पळ काढला. याबाबत तरुणीने राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

यावरून आरोपी सचिन चव्हाण, रा. शेनवडगाव, ता. राहुरी याच्या विरोधात विनयभंगाचा (Molestation) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी  अधिक तपास पोलीस नाईक महेश भवार हे करीत आहेत.

Web Title: Young man Molestation a 21-year-old married woman

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here