Accident: इको कार आणि ट्रकचा भीषण अपघात, पघातात एक चार वर्षांचा मुलगा जखमी, या अपघातात 9 जणांचा मृत्यू.
मुंबई: मुंबई-गोवा महामार्गावर) इको कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. हा अपघातरायगडजवळील रेपोली गावाजवळ झाला असून यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते.
अधिक माहितीनुसार, रायगडमधील गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेपोली गावाजवळ इको कार (MH-48 BT8673) आणि ट्रकची (MH-43/U/7119) समोरासमोर धडक झालेले. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये चार महिला आणि पाच पुरुषांचा समावेश आहे. तर अपघातात एक चार वर्षांचा मुलगा जखमी झाला आहे. जखमी मुलाला उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे पाठवले आहे. इको कारमधील प्रवासी हे एकमेकांचे नातेवाईक असून ते हेदवी (ता. गुहागर) येथे चालले होते.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. तसेच, अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काही वेळ खोळंबली होती. त्यानंतर पोलिसांनी महामार्गावरील अपघातग्रस्त वाहने बाजूला करुन वाहतूक पूर्ववत केली.
Web Title: accident on Mumbai-Goa highway at Repoli, Raigad, people died
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App