Home अहमदनगर ब्रेकिंग: बंडखोर सत्यजीत तांबेंची काँग्रेसकडून हकालपट्टी

ब्रेकिंग: बंडखोर सत्यजीत तांबेंची काँग्रेसकडून हकालपट्टी

Nashik graduate constituency election Satyajeet Tambe: काँग्रेसकडून सत्यजीत तांबेंवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

Expulsion of rebel Satyajeet Tambe from Congress

Satyajeet Tambe News: सत्याजीत तांबेंच्या बंडखोरीनंतर नाशिक पदवीधर निवडणुकीत मोठा ट्वीस्ट आला होता. त्यानंतर काँग्रेसकडून सत्यजीत तांबेंवर कारवाई करण्यात आली आहे.

त्यानंतर आज मविआने नाशिकमध्ये शुभांगी पाटील आणि नागपूरमध्ये सुधाकर आडबालेंना पाठिंबा देण्याचे निश्चित झाले आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. ते मविआच्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

दरम्यान, बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल करणाऱ्या सत्यजीत तांबेंवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी मविआचे पाचही उमेदवार जिंकून येतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

विधानपरिषद निवडणूक मविआ एकत्रपणे लढणार असल्याचेही यावेळी पटोलेंनी यावेळी स्पष्ट केले. तसेच दुसऱ्यांची घरं फोडण्याचं काम भाजपकडून केले जात असल्याचा आरोपही पटोलेंनी यावेळी केला.

राज्याची जनताच भाजपला धडा शिकवेल असे म्हणत थोरातांशी आम्ही संपर्कात असल्याचे ते म्हणाले. मोदींच्या मुंबई दौऱ्याबाबत पटोले म्हणाले की, देशाच्या पंतप्रधांनी गटाराचं उद्घाटन करणे म्हणजे भाजप एकप्रकारे प्रधानमंत्री पदाच्या गरिमेला धक्का लावत आहे.

गेल्या नऊ वर्षांपासून मोदींनी भाजपचा प्रचार करण्याशिवाय काहीचं केले नाही असा घणाघात पटोलेंनी केला. त्यामुळे मोदींनी ग्रामपंचायत, महापालिका किंवा इतर गोष्टींसाठी यावं हा त्यांचा प्रश्न आहे.

Web Title: Expulsion of rebel Satyajeet Tambe from Congress

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here