Home Accident News Accident: घराची भिंत पडल्याने शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू  

Accident: घराची भिंत पडल्याने शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू  

Accident Schoolgirl dies after wall collapses

राहुरी | Accident: शनिवारी पहाटे 4.30 वाजेच्या दरम्यान पावसामुळे घराची भिंत कोसळून पडल्याने राहुरी तालुक्यातील उंबरे गावातील वैष्णवी सुनील ढोकणे (वय 11) या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता पाचवीत शिक्षण घेत होती.  या घटनेने उंबरे गावात शोककळा पसरली आहे.

या घटनेमुळे ढोकणे कुटुंबावर मोठा आघात घडला आहे, पहाटेच्या दरम्यान वीज कडाडली. त्यामुळे ढोकणे कुटुंबातील व्यक्तींना जाग आली. दरम्यान घराला हादरा बसला. समयसूचकता लक्षात घेता तात्काळ कुटुंबातील अन्य सदस्यांनी घराबाहेर पळ काढला. सुदैवाने कुटुंबातील अन्य व्यक्तींचा जीव वाचला. मात्र, दुर्दैवाने वैष्णवी ही त्या भिंतीखाली सापडल्याने वैष्णवीच मृत्यू झाला. यामध्ये आजी जखमी झाली. या घटनेचा धसका घेतल्याने त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्यावर सध्या पुढील उपचार सुरू आहेत. अत्यंत शोकाकुल वातावरणात वैष्णवी हिच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Accident Schoolgirl dies after wall collapses

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here