Home अहमदनगर Murder: अज्ञात महिलेच्या अंगावरील साडीचे पदराने तिचा गळा आवळून खून

Murder: अज्ञात महिलेच्या अंगावरील साडीचे पदराने तिचा गळा आवळून खून

Murder Case unidentified woman was strangled to death with a sari on her body

श्रीगोंदा |Murder:  तालुक्यातील सुरेगाव शिवारात एका 30 वर्षीय अज्ञात महिलेचा खून केल्याची घटना समोर आली आहे. डोक्यावर हत्याराने मारुन तसेच  अंगावरील साडीचे पदराने तिचा गळा आवळुन खून करण्यात शुक्रवार सायंकाळी उघडकीस आली  आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून सुरेगाव येथील दत्तात्रय संपत रोडे यांच्या जमिनीच्या बांधावर मृतदेह आढळून आल्याने सुरेगावचे पोलिस पाटील महादेव तान्हाजी रोडे यांनी पोलिसांना माहिती दिली.

घटनास्थळी पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ  यांच्यासह अधिकारी-कर्मचार्‍यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. महिलेच्या डोक्यात हत्याराने वार करून साडीने गळा आवळून जीवे ठार केल्याचा प्राथमिक अंदाज पोलीसांनी व्यक्त केला आहे. तसेच महिलेची ओळख पटू नये म्हणून महिलेच्या चेहर्यावर केमिकल टाकून चेहरा विद्रूप केला असल्याचे निदर्शनास आले आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिस निरीक्षक दुधाळ यांना तपासाच्या सूचना दिल्या आहेत. या प्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात पोलिस पाटील महादेव तान्हाजी रोडे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात इसमाविरुद्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंचनामा करून महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी श्रीगोंदे येथे पाठविण्यात आला आहे. पोलीस कसून चौकशी करीत आहे.

Web Title: Murder Case unidentified woman was strangled to death with a sari on her body

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here