Home अकोले Lockdown: संगमनेर अकोले सह जिल्ह्यातील ही ६१ गावे १० दिवसांसाठी प्रतिबंधित

Lockdown: संगमनेर अकोले सह जिल्ह्यातील ही ६१ गावे १० दिवसांसाठी प्रतिबंधित

Ahmednagar 61 village lockdown 

अहमदनगर | Ahmednagar Lockdown:  जिल्ह्यातील  पेक्षा जास्त सक्रीय कोरोनाबधीत रुग्णसंख्या असणाऱ्या खालीलप्रमाणे नमूद केलेल्या तालुक्यातील गावांमध्ये अत्यावश्यक सेवा, दवाखाने, मेडिकल, टेस्टिंग सेंटर इत्यादी वगळता इतर सर्व आस्थापना दुकाने, वस्तू विक्री, सेवा इ. दिनांक ४ ऑक्टोबर रोजी १ वाजेपासून ते दिनांक १३ ऑक्टोबर २०२१ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत बंद ठेवण्याबाबत असा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आदेशित केला आहे. 

सदरच्या क्षेत्रामध्ये ५ पेक्षा जास्त व्यक्तीस एकत्र येण्यास मनाई राहील तसेच सदर क्षेत्रातील नागरिकांचे आगमन व प्रस्थान तसेच सदर क्षेत्रातून कृषी माल व आवश्यक वस्तू वाहतूक वगळता इतर वाहनांचे अवागमन प्रतिबंधित करण्यात येत आहे. 

तालुके: 

अकोले: लिंगदेव , वीरगाव, परखतपूर 

कर्जत: खांडवी, बाभूळगाव दुमाला 

कोपरगाव: गोधेगाव 

नेवासा: कुकाना

पारनेर: वडनेर बुद्रुक, कान्हेर पठार, गोरेगाव, दैठनेगुंजाळ, जामगाव, भाळवणी 

राहता: कोल्हार बुद्रुक, भगवतीपूर, पिंपरी निर्मळ , अस्तगाव, कोहाळे, लोणी बुद्रुक, लोणी खुर्द 

संगमनेर: गुंजाळवाडी, शेडगाव, निमगाव जाळी, आश्वी बुद्रुक, आश्वी खुर्द, पारेगाव बुद्रुक, पानोडी, शिबालापूर, बोटा, उंबरी, पिंपरणे, वेल्हाळे, खळी, देवगाव, घुलेवाडी, कोल्हेवाडी, वडगाव लांडगा, तळेगाव, घारगाव, चंदनापुरी, कनोली, निमोन, वडगाव पान, सायखिंडी

शेवगाव: भातकुडगाव, घोटण, दहीगवाणे, आव्हाने बुद्रुक 

श्रीगोंदा: लोणी व्यंकनाथ, घारगाव, बेलवंडी, मढेवडगाव, शेडगाव, येलपणे , कौठा, कोळगाव, काष्टी

श्रीरामपूर: बेलापूर खुर्द, उक्कलगाव, कारेगाव  

Web Title: Ahmednagar 61 village lockdown 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here