Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग: मालट्रकने दोन शाळकरी मुलांना चिरडले, दोघांचा मृत्यू

अहमदनगर ब्रेकिंग: मालट्रकने दोन शाळकरी मुलांना चिरडले, दोघांचा मृत्यू

Parner Accident News: शाळकरी मुलांना चिरडल्याची घटना.

Accident truck crushes two schoolboys, both dead 

पारनेर: सुपा पारनेर रोडवर एका मालट्रकने बुधवारी दुपारी वाळवणे येथील दोन शाळकरी मुलांना चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

वाळवणे ता.पारनेर येथील थोरात व पठारे परिवारातील दोन मुले पारनेर येथे शाळेला जात असताना बुधवारी दुपारी १२.०० वाजण्यच्या दरम्यान माल ट्रक (क्र MH 18 BA 0198) या ट्रकने धडक दिल्याने हे शाळकरी मुले गाडीच्या चाकाखाली आल्याने जागेवरच मयत झाले. प्राथमिक मिळालेल्या माहीतीनुसार दोन्ही विद्यार्थी पारनेर येथे परिक्षेसाठी जात असावे अशे बोलले जात आहे .

या घटनेची माहिती कळताच सुपा पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक डॉ नितीनकुमार गोकावे आपल्या फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गाडीखाली गुंतलेले मृतदेह ट्रकच्या पुढील चाकाखाली गुंतलेली मोटारसायकल व येथील घटनास्थळाची परिस्थितीची माहिती घेतली व दोन्ही मृतदेह पुढील सोपसकार पुर्त करण्यासाठी पारनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. दोन्ही मुले वाळवणे गावातील असुन शाळेसाठी पारनेरला जात असताना अपघात झाल्याने गावातील दोन तरुण मुले गेल्याने वाळवणे गावावर शोककळा पसरली आहे.

Web Title: Accident truck crushes two schoolboys, both dead 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here