Rape Case | पती घरात नसताना विवाहितेवर वर्षभर बलात्कार
Pune rape Case: महिलेचा नातेवाईक असलेल्या 27 वर्षीय तरुणाविरोधात बलात्काराचा गुन्हा.
पुणे: पती घरात नसताना नातेवाईक तरुणाने एका विवाहितेवर वारंवार बलात्कार केल्याची घटना पुण्यातील लोणीकंद पोलीस स्टेशनच्य हद्दीतून समोर आली आहे. याबाबत 29 वर्षीय विवाहित तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार याच महिलेचा नातेवाईक असलेल्या 27 वर्षीय तरुणाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एप्रिल 2021 ते ऑगस्ट 2022 या कालावधीत हा सर्व प्रकार घडला.
याप्रकरणी मिळालेली माहिती अशी की, महिला लोणीकंद परिसरात पतीसह राहते. तिचा पती हा चालक असल्यामुळे तो दिवसभर घराबाहेर असायचा. याचाच फायदा घेऊन आरोपी असलेल्या महिलेच्या नातेवाईकाने घरात येऊन वारंवार तिच्यासोबत ओळख वाढवली. त्यानंतर तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. इतकेच नाही तर आरोपीने फिर्यादी महिलेला बदनामी करण्याची धमकी देऊन व्हिडिओ कॉल केला. दोघांचेही नग्न अवस्थेतील फोटोचे स्क्रीनशॉट ते काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिली.
आरोपी वारंवार घरात येऊन धमकी देऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत असल्याने महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. लोणीकंद पोलीस पुढील तपास करत आहेत.
Web Title: married woman was rape for a year when her husband was not at home