Home संगमनेर संगमनेर: पुणे नाशिक महामार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक, अपघातात दोन जण…

संगमनेर: पुणे नाशिक महामार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक, अपघातात दोन जण…

Accident Two two-wheelers collided head-on on Pune-Nashik highway, killing two persons

Sangamner | संगमनेर: संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील पुणे नाशिक महामार्गावर घारगाव बस स्थानक परिसरात दोन दुचाकींची जोरदार धडक झाली. या अपघातात (Accident) दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. आज बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, चंदू तुळशीराम पवार राहणार (धांदरफळ)  हे दुचाकी क्रमांक एम एच १२ई सी ४१७६ हीच्यावरुन आळेफाटयाकडून संगमनेरच्या दिशेने चालले होते तर ते घारगांव बस स्थानक परीसरात आले असता संतोष गंगाराम साबळे राहणार (ओझर, संगमनेर) हे दुचाकी क्रमांक एम एच १७ बी टी ४१४९ हीच्या वरून  संगमनेर कडून आळेफाट्याच्या दिशेने चालले असता घारगांव बस स्थानक परीसरात आले असता त्याच दरम्यान या दोनही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन दोघेही गंभीर जखमी झाले. तर दुचाकींचेही नुकसान झाले.

घटनेची माहिती समजताच घारगांव पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक राजेंद्र लांघे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व जखमींना रुग्णवाहिकेतून संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात पाठविण्यात आले.

Web Title: Accident Two two-wheelers collided head-on on Pune-Nashik highway, killing two persons

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here