Home अकोले राजूर: अॅड.एम.एन.देशमुख महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

राजूर: अॅड.एम.एन.देशमुख महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

राजूर: अॅड.एम.एन.देशमुख महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

ललित मुतडक राजूर प्रतिनिधी :– हास्य हा आनंदी जीवनाचा पाया आहे आणि हास्यासाठी विनोद गरजेचा आहे.असे मार्गदर्शन मा.बंडा जोशी यांनी अॅड.एम.एन.देशमुख महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षातील वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात केले.प्रसिद्ध हास्यकवी व हास्य पंचमीकार बंडा जोशी यांच्या हस्ते वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला,यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी त्यांनी एकपात्री विनोदी कार्यक्रम सादर केला.या कार्यक्रमात त्यांनी चालू घडामोडीवर केलेल्या मार्मिक विनोदांमुळे विद्यार्थ्यांमध्ये हास्याची कारंजी फुलत होती.
याप्रसंगी सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष अॅड.मनोहरराव देशमुख कार्यकमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत असताना त्यांनी विद्येचे महत्त्व विशद केले. प्रसंगी संस्थेचे सचिव मा.टि.एन.कानवडे, सत्यनिकेतन संस्थेचे पदाधिकारी,सौ.देशमुख, सौ.जोशी व इतर मान्यवर यावेळी उपस्थितीत होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अतिथींचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.देशमुख  यांनी केले.याप्रसंगी प्रमुख अतिथी बंडा जोशी यांच्या हस्ते गुणवंत व विविध स्पर्धा विजेत्या विद्यार्थांचा गुणगौरव करण्यात आला.या वर्षीचा महाविद्यालयाचा बेस्ट स्टुडंट ऑफ दि इयर हा पुरस्कार धनंजय मोहीते तर उत्कृष्ठ कर्मचारी हा पुरस्कार श्री.विकास सोनवणे यांना प्रदान करण्यात आला.तसेच महाविद्यालयातील विशेष गुणवत्ता प्राप्त,पुरस्कार प्राप्त शिक्षकांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.
वार्षिक अहवाल वाचन प्रा.विकास नवले वकनिस्ट महाविद्यलाचे वाचन प्रा.गवळी मॅडम यांनी तर पुरस्कार वाचन प्रा.संजय कडलग यांनी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.पी.टी.करंडे व डॉ.रेखा कढणे यांनी तर आभार प्रदर्शन विद्यार्थी प्रतिनिधी सुरेश गुडनर याने केले.कार्यक्रमाच्या संयोजनासाठी महाविदयालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. 
छाया :- ललित मुतडक.

Website Title: Adv m n deshmukh college rajur Prize distribution


संगमनेर न्यूज | Sangamner News | वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा. संगमनेर अकोले बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक करा. Facebook Page. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here