Home अकोले राजूर: दोन महिन्यात प्रश्न सुटला नाही तर आमच्यावर गोळ्या झाडल्या तरी बेहत्तर

राजूर: दोन महिन्यात प्रश्न सुटला नाही तर आमच्यावर गोळ्या झाडल्या तरी बेहत्तर

राजूर: दोन महिन्यात प्रश्न सुटला नाही तर आमच्यावर गोळ्या झाडल्या तरी बेहत्तर

ललित मुतडक राजूर प्रतिनिधी :– दोन महिन्यात प्रश्न सुटला नाही तर आमच्यावर गोळ्या झाडल्या तरी बेहत्तर, घाटघर धरण फोडण्यात येईल.
             घाटघर उदंचन जलविद्युत प्रकल्पाच्या संबंधित आमच्या मागण्या बोगद्याच्या तोंडावर येत्या काळात तातडीने निर्णय घेऊन मार्गी लागतील अशी कार्यवाही झाली नाही तर प्रकल्पग्रतांच्या भावनांचा उद्रेक झाल्यास त्यास आदिवासी शेतकरी जबाबदार राहणार नाहीत. त्यामुळे घाटघर उदंचन जलविद्युत प्रकल्प कोणतीही पूर्वसूचना न देता बंद करून ते फोडून त्यातील पाणी भंडारदरा धरणाच्या पाण्यात सोडण्यात येईल. यासाठी भलेही सरकारने आमच्यावर बंदूकीतून गोळ्या झाडल्या तरी चालेल, आम्ही आमच्या बायकामुलांसह मरायला व व जेलमध्ये जायला तयार आहोत, असा इशारा घाटघर उदंचन जलविद्युत प्रकल्पग्रतांच्या आंदोलनात सहभागी प्रकल्पग्रतांच्या वतीने देवीदास खडके यांनी दिला.कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांशिवाय हे आंदोलन करण्यात आले.यावेळी कार्यकारी अभियंता उमेश पवार यांनी दोन महिन्यात प्रकल्पग्रतांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या लेखी आश्वासनानंतर सुमारे चार तास सुरू असलेले हे आंदोलन दुपारी तीन वाजता मागे घेण्यात आल्याचे प्रकल्पग्रतांचे नेते देवीदास खडके यांनी जाहीर केले. 
      प्रतिदिन २५० मेगावॉट विजेची निर्मिती करणाऱ्या भारतातील सर्वात मोठा असलेल्या घाटघर उदंचन जलविद्युत प्रकल्पातील प्रकल्पग्रतांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी बोगद्याच्या तोंडावर मंगळवारी (५ फेब्रुवारी) सकाळी दहा वाजता जलसमाधी धरणे आंदोलन करण्यात आले.घाटघर उदंचन जलविद्युत प्रकल्पातील धरणग्रस्तांच्या कुटुंबातील नोकरी पासून वंचित असलेल्या तरूणांना नोकरीत सामावून घ्यावे, प्रकल्पग्रतांच्या उर्वरित शेतजमिनीला सिंचनासाठी पाणी पुरवठा करावा, प्रकल्पग्रतांच्या गावांतील रस्त्यांचे डांबरीकरण व काँक्रीटीकरण करण्यात यावे,प्रकल्पग्रतांच्या जमिनी निवाडा प्रकरणात जमिनीला योग्य भाव द्यावा व जलाशयात बुडालेल्या फळझाडे व इतर झाडांचा मोबदला रक्कम त्वरीत द्यावी या मागणीसाठी घाटघर उदंचन जलविद्युत प्रकल्पावर हे जलसमाधी धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी घाटघर उदंचन जलविद्युत प्रकल्पाचे ठाणे (कळवा) जलसंपदा विभागाचे उपअभियंता किरण रोटे,महसूल विभागाचे मंडलाधिकारी प्रेमकुमार पवार, संगमनेर येथील ज्येष्ठ विधिज्ञ अनिलकुमार आरोटे उपस्थित होते.राजूर येथील सहायक पोलीस निरीक्षक पी.वाय.कादरी यांच्या उपस्थितीत धरण परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 
   यावेळी घाटघर उदंचन जलविद्युत प्रकल्पग्रतांचे नेते देवीदास खडके यांनी उपअभियंता किरण रोटे यांना सर्वासमोर उभे करून गेल्या २० वर्षे पूर्ण न झालेल्या मागण्या संदर्भात सवाल उपस्थित करून त्यावरील खुलासे घेतले.घाटघर उदंचन जलविद्युत प्रकल्पग्रतांच्या आंदोलनात घाटघरचे माजी सरपंच धोंडीबा सोंगाळ म्हणाले की,या अधिकारी व कर्मचारी यांच्या मनमानीला आम्ही कंटाळलो असून आता आत्महत्या करण्याशिवाय आमच्या पुढे  दुसरा पर्याय नाही. रमेश खडके म्हणाले,२००२ पासून आमच्या १८ नागरी सुविधा देण्यात आल्या नाहीत,त्या त्वरीत मिळाव्यात.सुरेश खडके म्हणाले की,प्रकल्प होण्यापूर्वी आम्ही सर्वजण सुखी होतो,पण आमच्या जमिनी संपादित करून आमच्या नशिबी मरणयातना आल्या आहेत. यावेळी लक्ष्मण गांगड,लव्हाळवाडीचे शंकर पोकळे, शिंगणवाडीचे माजी सरपंच रावजी मधे,मनोज पोकळे,श्रीधर सोनवणे यांनी आपल्या भाषणातून पोटतिडकीने प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी धरणग्रस्तांच्या व्यथा मांडल्या. तसेच  कोणत्याही परिस्थितीत आजच्या आज यासंदर्भात निर्णय घेतला पाहिजे,तोपर्यंत इथून एकही अधिकारी व कर्मचारी हालू देणार नाही असा इशारा देतानाच आंदोलक या धरणातील पाण्यात जलसमाधी घेऊन आत्महत्या करतील, असेही नमूद केले.यामुळे काहीकाळ वातावरण तणावपूर्ण बनले होते.पण देविदास खडके यांनी समंजसपणा दाखवून कार्यकारी अभियंता उमेश पवार यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्याबाबतची भूमिका घेतल्याने तणाव कमी झाला.आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी या आंदोलनात मोठ्या संख्येने आदिवासी शेतकरी व महिला सहभागी झाल्या होत्या.कार्यकारी अभियंता उमेश पवार यांनी यापूर्वी प्रलंबित असलेल्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी लक्षपूर्वक काम करणारे आश्वासन दिले.आश्वासन मिळाल्याने देविदास खडके यांनी  आभार मानले.
कोट – संगमनेर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात प्रकल्पग्रतांच्या दाव्याचा २०१२ रोजी निकाल लागला आहे.यावेळी जलसंपदा विभागाच्या वतीने काम पहाणार्‍या वकिलाने १ लाख रुपये प्रती हेक्टर देऊ व आमची मागणी ४ लाख रुपयांची होती.यावर तडजोडी होऊन न्यायालयात २ लाख रुपये मंजूर करण्यात आले. त्यामुळे आता पुन्हा कोणत्या  तडजोडीची अपेक्षा जलसंपदा विभागाकडून आहे ?आता कोणत्याही तडजोडी केल्या जाणार नाही, न्यायालयात मंजूर रक्कम आम्हाला मिळाली पाहिजे. 
– देवीदास खडके,आंदोलक,घाटघर उदंचन जलविद्युत प्रकल्प.
कोट – घाटघर उदंचन जलविद्युत प्रकल्पग्रतांच्या मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष झाले असून निश्चितपणे प्रकल्पग्रतांची हेळसांड झाली आहे, हे मी मान्य करतो. घाटघर उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी पुर्वी ६ विभाग व अनेक उपविभाग कार्यरत होते.पण आता मात्र केवळ २ उपविभाग शिल्लक आहेत,बाकी सर्व बंद करण्यात आली आहेत.एकूण १८४ पैकी फक्त १४०पैकी आजून ७० लोकांना नोकर्‍या देणे बाकी आहेत.मात्र ते धोरणात्मक बाब आहे.तसेच प्रकल्पग्रतांच्या उर्वरित शेतजमिनीला सिंचनासाठी पाणी पुरवठा करण्याची तरतूद या प्रकल्पात नाही.
– उमेश पवार,कार्यकारी अभियंता,घाटघर उदंचन जलविद्युत प्रकल्पाचे ठाणे (कळवा) जलसंपदा विभाग.

Website Title: Rajur Ghatghar projects demand


संगमनेर न्यूज | Sangamner News | वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा. संगमनेर अकोले बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक करा. Facebook Page. 


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज, संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436. त्यासाठी येथे क्लिक करा


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here