Home संगमनेर संगमनेर: पत्नीच्या आत्महत्येनंतर पतीचीही आत्महत्या, चिट्ठीतून कारण आले समोर

संगमनेर: पत्नीच्या आत्महत्येनंतर पतीचीही आत्महत्या, चिट्ठीतून कारण आले समोर

Sangamner: वन विभागाच्या क्षेत्रात एका झाडाच्या फांदीला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेत पतीने आत्महत्या (Suicide).

After the wife's suicide, the husband also commits suicide

संगमनेर:  संगमनेर तालुक्यातील  विरह असह्य  करणारी घटना समोर आली आहे. संगमनेर तालुक्यातील म्हसवंडी येथे बुधवारी हा प्रकार उघडकीस आला. वन विभागाच्या क्षेत्रात एका झाडाच्या फांदीला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेत पतीने आत्महत्या केली.  पत्नीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर सातच दिवसांत पतीनेही गळफास घेऊन जीवन संपविले. ‘पत्नीवर खूप जीव होता. तिची आठवण केली. येत आहे, अशी आशयाची चिठ्ठी पतीकडे सापडली.

तान्हाजी ज्ञानदेव बोडके (वय ३२) व त्यांची पत्नी सारिका तान्हाजी बोडके (वय २६) असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. सारिका व तान्हाजी बोडके हे दाम्पत्य म्हसवंडी येथे राहत होते. त्यांना पाच वर्षांची मुलगी आहे. १३ जुलै रोजी सारिका यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सात दिवसांनंतर बुधवारी तान्हाजी बोडके यांनी परिसरातील गवळी बाबाचे दांड येथील वन विभागाच्या क्षेत्रात एका झाडाच्या फांदीला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या करत आपले जीवन संपविले.

याप्रकरणी वैभव विठ्ठल बोडके यांनी फिर्याद दिली आहे. पोलिस उपनिरीक्षक उमेश पतंगे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठविला. आत्महत्येपूर्वी तान्हाजी यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामध्ये पत्नीवर खूप जीव होता. तिची आठवण येत आहे. मी आत्महत्या करत आहे. माझी जमीन मुलीला देण्यात यावी. कोणालाही दोष देऊ नये, असा मजकूर लिहिला आहे. दोघांच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.

Web Title: After the wife’s suicide, the husband also commits suicide

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here